Narendra Modi Rojgar melava: महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी; पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा!
Narendra Modi Rojgar melava: महाराष्ट्र (Maharashtra): महाराष्ट्रासाठी नक्कीच ही आनंदाची बातमी आहे. मुंबईत रोजगार मेळावा (Mumbai Rojgar Melava) आयोजित करण्यात आला असून यावेळी नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्रात २ लाख कोटींचे २२५ प्रकल्प मंजूर करण्यात आले असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिली आहे. तसेच महाराष्ट्रात भविष्यात तरुणांसाठी रोजगाराच्या (Employment) अधिक संधी उपलब्ध होतील असा विश्वास देखील व्यक्त केला.
आज देशभरात पायाभूत सुविधा, माहिती-तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांमध्ये सरकार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. यामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. महाराष्ट्रात २ लाख कोटींपेक्षा जास्त २२५ प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांवर काम सुरु आहे किंवा सुरु होत आहे. महाराष्ट्रात रेल्वेसाठी (Maharashtra Railway) ७५ हजार कोटी आणि रस्ते विकास (Road Development) प्रकल्पासाठी ५० हजार कोटींचा निधी (Fund) देण्यात आला आहे,” अशी माहिती मोदींनी दिली.
must read:
- Maharashtra kesari : म्हणून Maharashtra Kesri स्पर्धेत वादंग; आव्हानवीर सिंग व मनसेच्या भुमिकेकडे लक्ष
- Food recipe :हिवाळ्यात चुटकीसरशी बनवा “ही” चविष्ट आणि हेल्दी रेसिपी ;प्रत्येकजण आवडीने खाईल
- Potato Peels Benefits: “हे “आहेत बटाट्याच्या सालीचे फायदे ;त्यांना फेकण्यापूर्वी 100 वेळा विचार करा.
- लेक मालतीला अमेरिकेतच सोडून तीन वर्षांनी मुंबईत आली प्रियांका चोप्रा… काय आहे कारण?
त्याचप्रमाणे “स्टार्टअप, लघु उद्योगांना संभाव्य आर्थिक मदत सरकार देत आहे. जेणेकरुन तरुणांना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. सरकारच्या प्रयत्नांमधून रोजगाराच्या संधी दलित, आदिवासी, महिलांना समान स्वरुपात उपलब्ध होत आहे,” हे ही त्यांनी सांगितले.