Narendra Modi : एक्झिट पोलनंतर नरेंद्र मोदी ॲक्शन मोडवर, बैठकीत ठरवणार 100 दिवसांचा अजेंडा

Narendra Modi : लोकसभा निवडणुकीसाठीचे सर्व टप्प्यांतील मतदान संपले आहे. संपूर्ण देशासह राज्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे. अशातच विविध माध्यम संस्थांच्या एक्झिट पोलमध्ये देशात पुन्हा एकदा भाजप निवडून येण्याची शक्यता वर्तवली आहे.

एक्झिट पोलनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ॲक्शन मोडवर आले आहेत. नरेंद्र मोदी आज सुमारे 7 बैठका घेणार आहेत. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नुकतेच भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी प्रत्येक राज्यातील जागांच्या संदर्भात आपले महत्त्वाचे विधान केले होते.

या महत्त्वाच्या मुद्द्यांवर करणार चर्चा

  • चक्रीवादळानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते पहिली बैठक घेणार आहेत.
  • तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील उष्णतेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार आहेत.
  • जागतिक पर्यावरण दिन मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी नरेंद्र मोदी एक महत्त्वाचे बैठकही घेणार आहेत.
  • नरेंद्र मोदी 100 दिवसांच्या कार्यक्रमाच्या अजेंड्याचा आढावा घेण्यासाठी दीर्घ विचारमंथन करणार आहेत.
  • लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू करण्याआधीच नरेंद्र मोदी यांनी नवीन सरकारसाठी 100 दिवसांचा अजेंडा तयार करण्याची कसरत सुरू केली.

400 आकडा पार करणार का?

नरेंद्र मोदींनी अगोदरच सांगितले आहे की त्यांच्या सरकारच्या ऐतिहासिक तिसऱ्या कार्यकाळात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येतील. शनिवारी जाहीर झालेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला 350 पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. अशातच तीन एक्झिट पोलने NDA 400 जागांचा टप्पा पार करेल असा अंदाज वर्तवला आहे.

Leave a Comment