Narayan Rane Claim Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीत महायुतीत जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. राज्यातील (Narayan Rane) असे काही मतदारसंघ आहेत की ज्या ठिकाणी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात एकमत होऊ शकलेले नाही. नेत्यांच्या मॅरेथॉन बैठका सुरू आहेत परंतु समाधानकारक तोडगा काढण्यात अपयश आले आहे. ज्या मतदारसंघात तिढा निर्माण झाला आहे त्यामध्ये नाशिक, धाराशिव, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, जळगाव यांसारख्या मतदारसंघांचा समावेश आहे. असं असलं तरी आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ पुन्हा चर्चेत आला आहे.
या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर उमेदवार निवडणूक लढणार असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी (Narayan Rane) केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे मित्रपक्ष शिंदे सेनेत अस्वस्थता पसरली आहे. कारण या मतदारसंघात उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. आता नारायण राणे यांच्या वक्तव्याने शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे.
Narayan Rane
या मतदारसंघाबाबत बोलताना नारायण राणे म्हणाले की या ठिकाणचा उमेदवार उद्यापर्यंत जाहीर होईल. ज्याला उमेदवारी जाहीर होईल तो कामाला लागेल, असेही राणी यांनी स्पष्ट केले. तसं पाहिलं तर कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र महायुतीत सिंधुदुर्ग-रत्नागिरी या मतदारसंघावरून जोरदार रसखेच सुरू झाली आहे. या मतदारसंघात उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी दावेदारी सांगितली आहे. यंदा निवडणुकीत तिकीट आपल्यालाच मिळेल असा विश्वास बाळगत त्यांनी कामाला सुरुवात केली आहे.
परंतु या मतदारसंघावर भाजपचाही डोळा आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना या मतदारसंघातून तिकीट देण्याचा विचार भाजप श्रेष्ठींचा आहे. परंतु यासाठी आधी शिंदे गटाला शांत करावे लागेल त्याशिवाय या मतदारसंघाचा ताबा भाजपकडे येणार नाही. या गोष्टीची जाणीव भाजप नेत्यांनाही आहे. त्यामुळेच त्यांनी आता नारायण राणे यांना पुढे केल्याचे दिसून येत आहे. राणे यांनीही या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. त्यामुळे दोन्ही गटात तणाव निर्माण झाला आहे.
Narayan Rane
Madha Lok Sabha : माढ्यात महायुतीचा उमेदवार ठरला पण, ‘मविआ’त तिढा?, शरद पवारांच्या मनात काय..