Nano Particle wheat Seed: पुणे (pune): शेतीमधील संशोधन ही काळाची गरज आहे. मात्र, त्याकडे देशभरात दुर्लक्ष होत आहे. अशावेळी आयआयटी कानपूर याच्या इनक्यूबेटेड कंपनी एलसीबी फर्टिलायझरने गव्हाचे नॅनो कोटेड पार्टिकल सीड तयार केले आहे. ही शेतीमधील एक क्रांती ठरण्याची शक्यता आहे. कारण, पेरणीनंतर यास तब्बल 35 दिवस पाणी लागणार नाही. तसेच कडक उन्हातही पीक खराब होणार नाही असे संशोधकांचे म्हणणे आहे. (IIT Kanpur Incubated Company LCB Fertilizer has prepared Nano Coated Particle Seed of Wheat)
- Agriculture News Update: याने शेतकरी होणार मालामाल; पंतप्रधान मोदींनी ६०० हून अधिक किसान समृद्धी केंद्र केले सुरु
- Agriculture News: लम्पी त्वचारोगाचा धोका कधी संपणार; पशुपालकांना लागली आहे चिंता
- Diwali 2022 Stories: दिवाळी सण का साजरा केला जातो? जाणून घ्या या सणाशी संबंधित रंजक किस्से
एलसीबी कंपनीने नुकताच या गव्हाच्या बियाण्यांवर प्रयोग केला असून, तो यशस्वी झाला आहे. त्यामुळे यंदा उत्तर प्रदेश राज्यातील तब्बल 35 जिल्ह्यांमध्ये या बियाणाची पेरणी प्रयोग होणार आहेत. हे फील्ड प्रयोग यशस्वी होणार असल्याचा दावा संस्थेचा आहे. यात गव्हाच्या बियाण्यावर नॅनो कण आणि सुपर शोषक पॉलिमरचा लेप (Wheat germ has been coated with nano particles and super absorbent polymers) लावला आहे. कंपनीचे इनक्यूबेटर तज्ञ अक्षय श्रीवास्तव (company’s incubator Akshay Srivastava) यांनी याबाबत सांगितले की, गव्हावरील हा पॉलिमर लेप 268 पट जास्त पाणी शोषून घेतो. परिणामी 35 दिवसांपर्यंत या पाण्याचा उपयोग करून पिकाची जोमदार वाढ होईल. त्यानंतर याद्वारे हळूहळू पाणी सोडते.
याव्यतिरिक्त याला जिवंत जीवाणूंचे संयोजनदेखील (combination of live bacteria) दिलेले आहे. यामुळे कंपोस्ट खत तयार होऊन पुन्हा-पुन्हा पिकाला खत देण्याची गरज भासणार नाही. कंपोस्टमध्ये सेंद्रिय नॅनो (Organic nanoparticles) कणांचा वापर करण्यात आलेला आहे. हे तब्बल 78 अंश तापमानातही जीवाणू जिवंत ठेवतात.
या बियाण्यांचा वापर केल्यास उत्पादनात 15 टक्के वाढ होईल. तसेच 33 टक्के कमी सिंचन पाणी आणि खर्चात तब्बल 48 टक्के बचत होते. आता साधारण गव्हाचे पीक 120-150 दिवसांत तयार होताना त्यासाठी तीन ते चार वेळा पाणी द्यावे लागते. नव्या बियाण्याला फक्त दोन सिंचनातही काम भागेल. यूपीच्या 35 जिल्ह्यांशिवाय बिहार, झारखंडमध्येही (uttar Pradesh, Bihar, Jharkhand) यावर काम सुरू आहे. या तंत्राने एक कॅप्सूलदेखील तयार करून झाडांना 35 दिवस पाणी देत राहील. यातून पाण्याबरोबरच पोषक तत्वेही मिळतील. शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान एक वरदान ठरणार आहे.