Nanded Rain : नांदेड (Nanded) जिल्ह्यातही परतीच्या पावसानं (Rain) धुमाकूळ घातला असून या पावसामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यातील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान या पावसामुळं झालं आहे. परतीच्या पावसानं कापसाच्या पिकाच्या वाती झाल्या आहेत. तर सोयाबीन पिकाला कोंब फुटले आहेत. गेल्या दहा दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळं सोयाबीनसह कापूस, मूग आणि उडीद ही पिकं देखील मातीमोल झाली आहेत.
https://marathi.abplive.com/news/nanded/raine-news-agricultural-damage-due-to-rain-in-nanded-1109930
परतीच्या पावसाचा पिकांना फटका :पावसाळ्याच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस, त्यानंतर अतिवृष्टी (Heavy rain )यामुळं दुबार-तिबार पेरणीनं आधीच शेतकरी राजा मेटाकुटीला आला होता. त्यानंतर आता परतीच्या पावसाचा पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. आता कापणीस आणि काढणीस आलेले सोयाबीन, मूग, कापूस ही पिकं परतीच्या पावसानं अक्षरशः मातीमोल झाली आहेत. नांदेड जिल्ह्यातील हदगाव, उमरी, बिलोली ,अर्धापुर, भोकर, नायगाव, माहूर, किनवट,मुखेड, मुदखेड ,धर्माबाद व देगलूर या सर्व तालुक्यात परतीच्या पावसानं कहर केला आहे. गेल्या दहा दिवसापासून जिल्हाभरात पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान, शेतकऱ्यांची सोयाबीन उडीद, मूग, कापूस ही हाती आलेली पिकं काढण्याची लगबग सुरु असताना पावसाच्या उच्छादामुळं ही पिके (crops )होत्याची नव्हती झाली. तर सततच्या पावसाच्या रिपरिपीमुळं काढणीस आलेल्या कापसाच्या पिकाच्या भिजून वाती झाल्या आहेत.
- Free Travel: “ही ” आहेत देशातील 5 प्रसिद्ध टिकणे जेथे तुम्ही राहू शकता मोफत
- Hair Treatment:” या “नैसर्गिक उपायांमुळे केस अकाली पांढरे होण्याची समस्या होईल दूर
- Food Recipe :संध्याकाळी भूक शमवण्यासाठी हे आरोग्यदायी ‘चवळी चाट’ एकदा करून पहा.
विमा कंपन्यांकडून पंचनामा नाही :सोयाबीनच्या पिकात गुढघाभर पाणी साचून सोयाबीनला(Soybean) कोंब फुटले त्यामुळं हाती आलेली पिकं मातीमोल झाली आहेत. तर शेतकऱ्यांनी पीक विमा भरला तरी विमा कंपन्यांकडून (insurance company )अद्याप कोणताही पंचनामा झाला नाही. कृषी मंत्र्यांनी (agriculture minister )शेतकऱ्यांचा पोळा गोड करु असे आश्वासन दिले , पण पोळा गेला, दसरा गेला आणि आता दिवाळी आली तरी सरकारकडून (Government Help )कोणतीही तत्काळ व ठोस मदत अद्याप शेतकऱ्यांना देण्यात आली नाही. त्यामुळं शेतकरी राजा मात्र पुरता हवालदिल झाला आहे.
सध्या राज्यात काही भागात परतीचा पाऊस (Rain) कोसळत आहे. या परतीच्या पावसामुळं अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच या पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. मुंबईसह ठाण्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली असून अन्य ठिकाणी मात्र, परतीच्या पावसाचा जोर कमी झाला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज राज्यात पावसाची शक्यता कमी आहे .