Dharmabad : नांदेड शहरासह तालुक्यात गेल्या पाच वर्षात एका मुलीवर एकाही महिलेने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली नसून  दोन मुलींच्या जन्मानंतर २२ मातांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया (family planning surgery )केली आहे. या २२ जणींना माझी कन्या भाग्यश्री योजनेचा (mazi kanya bhagyashri scheme )लाभ मिळण्यासाठी जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. परंतु त्यापैकी पाच मंजूर झाले आहेत. तर  निधीअभावी त्यांच्या बँक खात्यात (bank account ) अद्यापही पैसे जमा झाले नाहीत. तर १७ प्रस्ताव धूळ खात पडून आहेत. या योजनेचा लाभ अद्यापही लाभार्थ्यांना मिळाला नसल्याचे समोरआढळून आले आहे.

शासनाकडून  एक ऑगस्ट २०१७ नंतर जन्मलेल्या मुलींना माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा लाभ देण्यात येतो. एका मुलीवर आई अथवा वडील यापैकी एकाने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल तर पन्नास  हजाराचे (50 thousand rs)अनुदान देण्यात येते. दोन मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल तर प्रत्येक मुलीस प्रत्येकी २५ हजार रुपये अनुदान देण्यात येते. माझी कन्या भाग्यश्री योजनेतंर्गत लाभार्थी मुलगी व तिची आई किंवा वडील यांचे संयुक्त बचत खाते बँकेत (Bank account )उघडण्यात येऊन  त्यावर प्रशासनाच्या मदतीने पैसे जमा करण्यात येतात.

शासन स्थरावर  मुलगा अथवा मुलगी असा भेदभाव कमी करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, धर्माबादला पाच वर्षात एका मुलीवर एकाही महिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली  नाही. तर २२ आई किंवा वडिलांनी दोन मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून स्त्री अथवा पुरुष या भेदभावाला छेद दिला आहे. पाच वर्षातील आकडेवारीचा विचार केला असता  तालुक्यात अजूनही स्त्री पुरुष असा भेदभाव होत आहे. माझी कन्या भाग्यश्री चे उद्दिष्ट मुलीचा जन्मदर (Female Birth rate  )वाढवा, मुलींना शिक्षण मिळावे, मुलगा, मुलगी भेदभाव नष्ट व्हावा . असे अनेक उद्दिष्ट समोर ठेवून ही योजना शासनामार्फत राबविण्यात येते. परंतु  वंशाला दिवा हवा, हा विचार अद्याप दूर होत नाही.

https://www.esakal.com/nanded/nanded-process-upcoming-local-self-government-elections-stalled-echucas-preparations-full-swing-rsn93

एका मुलीवर शस्त्रक्रियेचे प्रमाण शून्य  :तालुक्यात गेल्या पाच वर्षात एकाही महिलेने एका मुलीवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेली नसल्या मुळे तालुक्यात स्त्री पुरुष हा भेदभाव किती मुळापर्यंत रुजलेला आहे हे आकडेवारीतून स्पष्ट होते . त्यामुळे या तालुक्यातील लोकप्रतिनिधी (people representative ) तसेच  प्रशासनाने आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असून जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबविण्याची गरज आहे.पाच वर्षात धर्माबाद तालुक्यातून फक्त २२ प्रस्ताव पाठवण्यात आले. त्यापैकी पाचच  मंजूर झाले . या योजनेतील निधीअभावी त्यांच्या बँक खात्यात अद्यापही पैसे जमा झाले नाहीत. तर १७ प्रस्ताव जिल्हापरिषदकडे पाठवण्यात आले असून ते मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. निधी येताच पैसे जमा होतील व उर्वरित प्रस्ताव देखील मंजूर होतील.

Share.

Leave A Reply

Exit mobile version