Nanded : यंदा दिवाळीनिमित्त अवघ्या १०० रुपयांत अन्नधान्याव्यतिरिक्त चार शिधावस्तू वाटपाचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, अंत्योदय योजना, प्राधान्य कुटुंब व जिल्ह्यातील एपीएल (केशरी) शेतकरी शिधापत्रिकाधारकांना नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येकी एक किलो चणा डाळ, एक किलो साखर एक किलो रवा, व एक लिटर पामतेल इत्यादींचा संच दिला जाणार आहे. नांदेड जिल्ह्यातील (Nanded District)सुमारे साडेतीन लाखावरील लाभार्थींना याचा लाभ मिळणार असून पुरवठा विभागाकडून (Food Corporation Department )वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना(Antyoday ann yojana ), प्राधान्य कुटुंब, एपीएल (केशरी) शेतकरी शिधापत्रिकाधारकांना आगामी दिवाळी सणानिमित्त नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त शिधाजिन्नस संच उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनाने(State Government ) घेतला आहे. पात्र रेशनकार्डधारकांना शिधाजिन्नस संच प्रतिशिधापिका ई-पाॅस प्रणालीद्वारे शंभर रुपये दराने वितरित करण्याचे आदेश राज्य शासना कडून देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागातर्फे जिल्ह्यासाठी आवश्यक शिधाजिन्नस संचाची मागणी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटीव्ह कंझ्युमर्स फेडरेशन लिमिटेड (मुंबई)( Maharashtra State co-operative consumers federation limited Mumbai )यांच्याकडे सादर केली आहे. त्यानुसार जिल्हानिहाय शिधाजिन्नस संच संधबित तालुका गोदामापर्यंत कंट्रदार पोहचवेल.
https://www.esakal.com/nanded/mata-sahibv-janmotsav-kirtan-conclusion-nagarkirtan-yatra-nanded-rj01
संचात समाविष्ठ शिधाजिन्नस एफएसएसएआय मानकाची पूर्तता करत असल्याचे एनएबीएल (NBL)अधिस्वीकृत प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र कंत्रादाराकडून प्राप्त करून घेवून त्यानंतर शिधाजिन्नस संच स्वीकारण्यात येईल. निकृट दर्जाचे शिधाजिन्नस संच स्वीकारले जाणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आदेश राज्य शासनाने पुरवठा अधिकाऱ्यांना दिले आहेत.
शिधावस्तू सुट्या नको, संच हवा :एक किलो रवा, एक किलो चणा डाळ, एक किलो साखर व एक लिटर पामतेल समाविष्ट असून प्रत्येक पात्र शिधापत्रिकाधारकास( Ration card holder )प्रति शिधापत्रिका एक संच वितरित करणे अनिवार्य आहे. कोणत्याही परिस्थितीत संचातील शिधावस्तू सुटे करून वितरित केले जाणार नाहीत, याची संबंधितांनी दक्षता घ्यावी असे निर्देश शासनाने दिले आहेत.
- Fitness Tips: “वर्क फ्रॉम होम” करताना तंदुरुस्त राहण्यासाठी “या” टिप्स फॉलो करा
- Weight Loss Tips: जिऱ्याच्या पाण्यात “या” गोष्टी मिसळा कमी होईल वजन, जाणून घ्या कसे बनवायचे योग्य पेय
- Jalgaon News : दिवाळीसाठी ST महामंडळ सज्ज “या “डेपोतून सुटणार जादा गाड्या; 20 – 31 ऑक्टोबरदरम्यान धावणार अतिरिक्त बसेस
निकृष्ट दर्जाच्या शिधावस्तू स्वीकारू नका :पुरवठा कंत्राटदाराने शिधावस्तू संच संबंधित तालुक्याच्या गोदामापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. या संचात समाविष्ट वस्तू एफएसएसएआय मानकाची पूर्तता करत असल्याचे एनएबीएल अधिस्वीकृत प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र कंत्राटदाराकडून प्राप्त करून घेऊन त्यानंतरच शिधावस्तू (Ration)संच स्वीकारावेत. कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट दर्जाच्या शिधावस्तू स्वीकारल्या जाणार नाहीत याचीही दक्षता घ्यावी असे निर्देश देखील शासनाने दिलेले आहेत.