Loksabha Election 2024 : ‘या’ पक्षाकडून नाना पाटेकर लढणार लोकसभा निवडणूक, गोविंदा, राज बब्बर यांना काँग्रेस देणार संधी?

Loksabha Election 2024 : येत्या काही दिवसात केंद्रीय निवडणूक आयोग 2024 च्या लोकसभा निवडणुकीची घोषणा करणार आहे.  तर राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे.

महाविकास आघाडी आणि महायुतीच्या घटक पक्षांमध्ये अद्याप जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नसल्याने अनेक चर्चांना उधाण आला आहे. यातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातून आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये बॉलीवूडमधील काही दिग्गज अभिनेते उतरण्याची शक्यता आहे.

काही मीडिया रिपोर्टनुसार अभिनेता नाना पाटेकर, गोविंदा आणि राज बब्बर निवडणुकीत उतरणार आहे. दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) ऑफर दिल्याची माहिती समोर आली आहे.

अजित पवार गट नाना पाटेकर यांना पुण्यातील शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे. जर असं झालं तर नाना पाटेकर शिरूर मतदारसंघात अभिनेते अमोल कोल्हे यांना टक्कर देणार.

पुण्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघात जोरदार रस्सीखेच सुरू आहे.  शिरूर हा शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांचा मतदारसंघ आहे. मराठी अभिनेता अमोल कोल्हे यांचा पराभव करण्याची जबाबदारी स्वतः अजित दादांनी उचलली आहे. त्यासाठी अजित पवार गटाने येथे जोरदार फिल्डिंग लावली आहे.

नुकतेच अजित पवार शिरूर दौऱ्यावर गेले असता त्यांनीच कोल्हे यांना राजकारणात आणल्याचे सांगितले होते. कोल्हे यांना राजकारणात रस नाही. अमोल कोल्हे यांनाही अभिनयाची पार्श्वभूमी असल्याने 73 वर्षीय पाटेकर त्यांच्यासाठी तगडे उमेदवार ठरू शकतात, असे बोलले जात आहे. त्यामुळे महायुतीच्या वतीने अजितदादा नाना यांना शिरूर मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांना या संदर्भात प्रश्न विचारला असता नाना आले तर त्यांचे स्वागत करू, असे ते म्हणाले. मात्र, अभिनेते नाना पाटेकर हे शिरूरमधून उमेदवारीसाठी फारसे इच्छुक नाहीत. त्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र त्यांच्या राजकारणातील प्रवेशाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

मालामाल होण्याची सुवर्णसंधी! मिळणार बंपर पैसा, फक्त करा ‘हे’ काम

‘आमच्याकडे राज बब्बर…गोविंदा आहे’

अभिनेत्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची परवानगी देण्याबाबतही काँग्रेसच्या गोटातून अनेक चर्चा सुरू आहेत. अभिनेते राज बब्बर आणि गोविंदा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. मात्र, काँग्रेस बब्बर आणि गोविंदा यांना उमेदवारी देणार असल्याचे अद्याप निश्चित झालेले नाही.

राज बब्बर हे याआधी उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद मतदारसंघातून खासदार होते. ते राज्यसभा सदस्यही राहिले आहेत. ते यूपी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही होते. त्याचबरोबर गोविंदाही काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झाले आहेत.

Credit Card वापरत असाल तर ‘ही’ बातमी वाचाच! RBI ने केली मोठी घोषणा

2004 च्या लोकसभा निवडणुकीत ते उत्तर मुंबईतून विजयी झाले होते. राज बब्बर काँग्रेसकडून निवडणूक लढवत असल्याच्या मुद्द्यावर पटोले म्हणाले, “आमच्याकडे राज बब्बर… गोविंदा आणि बरेच काही आहेत.” ज्यांच्याकडे राजकीय अनुभव आणि क्षमताही आहेत. त्यांना (भाजप) डकैती करू द्या… आम्ही योग्य वेळी आमचे पत्ते उघड करू.

1 thought on “Loksabha Election 2024 : ‘या’ पक्षाकडून नाना पाटेकर लढणार लोकसभा निवडणूक, गोविंदा, राज बब्बर यांना काँग्रेस देणार संधी?”

Leave a Comment