अहमदनर : नगर-शिर्डी-मनमाड या महामार्गावरून प्रवास म्हणजे एक ‘दिव्य अनुभूती’ घेण्याची प्रचिती आहे. त्यावरून सोशल मिडियामध्ये खासदार डॉ. सुजी विखे पाटील आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अनेकांनी जाब विचारला आहे. मात्र आता याच रस्त्याच्या कामासाठी नव्याने ८०० कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने मंजूर केला आहे. पुढील वर्षीच्या जानेवारी महीन्यातच या मार्गाच्या कामाला सुरूवात होणार असल्याची माहीती खासदार विखे पाटील यांनी दिली आहे.
ही एक मोठी गुड न्यूज आहे. कारण यामुळे या खड्डेमय रस्त्यातून मार्ग काढताना अनेकांना होणारा घाऊक त्रास किरकोळीत निघण्याची शक्यता आहे. याबाबत माहिती देताना डॉ. विखे पाटील म्हणाले की, मागील काही दिवसांपासून या मार्गासाठी निधी मिळवा आणि निविदा प्रक्रिया तातडीने व्हावी म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. आता त्याला यश आलेले आहे. आता झालेल्या निर्णयामुळे या पाठपुराव्याला यश येऊन हा रस्ता लवकरच चांगला होण्याचा मार्ग खुला झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या माध्यमातून देशभरात रस्ते विकासाचा मोठा कार्यक्रम सुरू आहे. देशभरात गावे आणि शहरांना याद्वारे पक्क्या आणि चांगल्या रस्त्याने जोडले जात आहे. याचाच एक भाग म्हणून नगर ते मनमाड या मार्गाचे काम कमी कालावधीत आणि गूणवतापूर्ण पध्दतीने पूर्ण करण्यासाठी हा प्रयत्न आहे. केंद्र सरकारने या महामार्गाकरीता ८०० कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. आता त्याची निविदा प्रक्रीया लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय स्तरावर तातडीने कार्यवाही केली जाईल. जानेवारी महीन्यातच या मार्गाच्या कामाला सुरूवात करण्याचे उद्दीष्ट केंद्र सरकारचे आहे.
Ahmednagar News: बाब्बो.. 10 बाय 10 च्या खोलीसाठी 1 लाखांची पाणीपट्टी..! मनपाचा अजब कारभार