NAFED Chairman Jethabhai Ahir : नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहीर यांनी नाशिक जिल्ह्यातील नाफेडच्या कांदा खरेदी-विक्री केंद्रांवर अचानक भेट देऊन नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक उघड केली आहे.
माहितीनुसार, काही दिवसांपासून अधिकारी व व्यापारी मिळून नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक करत होते. त्यामुळे त्यांनी अचानक कांदा खरेदी विक्री केंद्रावर भेट दिली. त्यानंतर त्यांना खरेदी-विक्री केंद्रांवर अनेक दोष आढळून आले.
तर दुसरीकडे नाफेडचे अध्यक्ष जेठाभाई अहीर यांच्याकडून कांदा खरेदी केंद्रावर पाहणी होत असल्याची भनक नाफेडशिवाय कृषी अधिकाऱ्यांनाही लागली नाही.
अहीर खाजगी कारण देत नाशिकच्या दौऱ्यावर आले होते मात्र अचानक ते देवळा येथील नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रावर पोहोचले. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. या केंद्रावर अहीर यांनी आतापर्यंत खरेदी केलेल्या कांद्याचा हिशेब घेतला तसेच शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी का झाला? याचा जाब देखील त्यांनी उपस्थित असणाऱ्या अधिकाऱ्यांना विचारला.
तर आता नाफेडच्या खरेदी केंद्रांवर काही दोष आढळून आल्याने याच्या तपासासाठी कमिटी नेमण्यात येणार असल्याची माहिती अहीर यांनी दिली आहे.