Mutual Funds : अनेकजण विविध योजनांमध्ये गुंतवणूक करतात. यापैकी एक म्हणजे म्युच्युअल फंड. जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल तर बातमी तुमच्या कामाची आहे. तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
SIP खाते क्रमांक
फेब्रुवारीमध्ये SIP खात्यांची संख्या 820.17 लाख एवढी ऐतिहासिक उच्च पातळी गाठली, जी जानेवारीमध्ये 791.71 लाखांपेक्षा जास्त होती. फेब्रुवारी महिन्यात नवीन एसआयपी नोंदणीची संख्या घटली असून जानेवारीत 51.84 लाखांच्या तुलनेत सुमारे 49.79 लाख नवीन SIP ची नोंदणी झाली आहे.
टाळा या चुका
गुंतवण्यापूर्वी करा संशोधन
तुम्ही एसआयपीमध्ये गुंतवणूक सुरू करण्याचा विचार करता त्यावेळी तुम्ही एसआयपीमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी संशोधन करणे गरजेचे आहे किंवा तुम्ही सल्लागाराचा सल्ला घेऊ शकता. संशोधनाशिवाय कोणत्याही फंडात पैसे गुंतवू नका.
गुंतवलेल्या रकमेचा परिणाम
गुंतवणूकदारांनी हे लक्षात ठेवा की एसआयपीमध्ये गुंतवलेली रक्कम जास्त किंवा कमी नसावी. ती तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार आणि जोखीम सहनशीलतेनुसार असावी. समजा तुम्ही खूप कमी पैसे गुंतवलेत तर तुम्हाला तेवढा चांगला परतावा मिळत नाही.
एसआयपीचा रिटर्न्स पाहू नका
अलीकडच्या काळात म्युच्युअल फंडातील गुंतवणूक खूप वाढली असून तुम्ही कोणताही एसआयपीचा निर्णय फक्त त्याचे रिटर्न्स पाहून घेऊ नका. कारण कधी कधी चांगला परतावा देणारे एसआयपीचे रिटर्नही नकारात्मक परतावा देतात.
विविध फंड आणि सेक्टर
तुम्ही विविध फंड आणि सेक्टरमध्ये पैसे गुंतवावेत. एखादा फंड किंवा सेक्टर नकारात्मक झाला तर तुमच्या पोर्टफोलिओवर जास्त परिणाम होत नाही.
अशी सुरु करा एसआयपी
तुम्ही पहिल्यांदा एसआयपीमध्ये गुंतवणूक करत असाल तर त्यासाठी तुम्हाला प्रथम ब्रोकरेज ॲप निवडावा लागणार आहे. तुम्ही Grow, Zerodha सारख्या कोणत्याही ॲपद्वारे गुंतवणूक चालू करू शकता. तुम्हाला केवायसीची औपचारिकता पूर्ण करून तुमच्या ॲपमध्ये व्हेरिफिकेशन आणि व्हिडिओ कॉल केवायसी होईल. नवीन खाते नोंदणी करण्यासाठी तुम्हाला एक अर्ज भरावा लागणार आहे. यानंतर तुम्हाला एसआयपीमध्ये पैसे गुंतवता येतील.