Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

मोठी बातमी…! ‘त्या’ प्रकरणात अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या भावाला अटक; बॉलिवूडमध्ये खळबळ

मुंबई – मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.बॉलिवूड (Bollywood) अभिनेता शक्ती कपूरचा (Shakti Kapoor) मुलगा आणि बॉलिवूडची चर्चित अभिनेत्री श्रद्धा कपूरचा (Shraddha Kapoor) भाऊ सिद्धांत कपूर (Siddharth Kapoor) याला ड्रग्ज प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.

Advertisement

वैद्यकीय तपासणीत ड्रग्ज घेतल्याची पुष्टी झाली असून या प्रकरणी त्याला बंगळुरूमधील उलासुरू पोलीस ठाण्यात आणण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

या कारवाईनंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये ड्रग्ज प्रकरण समोर आला असून यावेळी आता आणखीन कोणते मोठे खुलासे होणार हे पाहावे लागेल. मागच्या वेळी या प्रकरणात बॉलीवूड मधील अनेक चर्चित अभिनेते आणि अभिनेत्री यांची नावे जोडली गेल्याने चाहत्यांना धक्का बसला होता.

Loading...
Advertisement

करिअरमध्ये यश नाही
आम्ही तुम्हाला सांगतो की, सिद्धांत कपूर एक स्टार किड आहे. तो शक्ती कपूरचा मुलगा आणि श्रद्धा कपूरचा भाऊ आहे. सिध्दांतने फिल्मी दुनियेतही हात आजमावला पण त्याला वडील आणि बहिणीप्रमाणे यश मिळाले नाही. सिद्धांतने अनेक चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकाही केल्या आहेत. स्टार-किड असूनही, सिद्धांत कपूरने डिस्क जॉकी म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि नंतर हिंदी चित्रपटसृष्टीत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत काम केले. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सिद्धांतने ‘भूल भुल्लैया’, ‘भाग-भाग’, ‘चुप चुप के’, ‘ढोल’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले.

Advertisement

सिद्धांतचे चित्रपट
सिद्धांत कपूरने ‘शूटआउट अॅट वडाला’ या चित्रपटाद्वारे पदार्पण केले, ज्यामध्ये अनिल कपूर, कंगना रणौत आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत होते. यानंतर सिद्धांत अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘अग्ली’ या सायकोलॉजिकल थ्रिलर चित्रपटात दिसला. सिद्धांतने त्याची बहीण श्रद्धा कपूरसोबत स्क्रीनही शेअर केली आहे, दोन्ही भावंडं ‘हसीना पारकर’ चित्रपटात एकत्र दिसली होती, ज्यात श्रद्धाने दाऊदच्या बहिणीची भूमिका साकारली होती, तर सिद्धांतने या चित्रपटात दाऊदची भूमिका केली होती.

Advertisement

वेब सीरिजमध्येही काम केले आहे
सिद्धांत कपूर ‘चेहरे’ चित्रपटातही दिसला होता. हा चित्रपट एक मिस्ट्री-थ्रिलर आहे ज्याची कथा एका मित्र समूहाची आहे. या चित्रपटात सिद्धांत कपूरशिवाय रिया चक्रवर्ती, सिद्धांत कपूर, धृतमन चक्रवर्ती, रघुवीर यादव आणि अन्नू कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. याशिवाय ‘भौकाल’ नावाच्या वेब सीरिजमध्येही तो दिसला होता.

Advertisement
Advertisement

Leave a Reply