Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

कोरोना नियंत्रणाबाहेर! चौथ्या लाटेचे संकेत?; आज इतक्या रुग्णांची नोंद

नवी दिल्ली –  जूनच्या दुसऱ्या आठवड्यात देशात कोरोनाने (Corona Virus) जोर पकडला आहे. गेल्या 7 दिवसांत देशातील कोरोना रुग्णांची (Corona patients) संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. भारताच्या ताज्या कोरोना बुलेटिनबद्दल बोलायचे तर, गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 8329 नवीन रुग्ण आढळले आहेत. यावेळी देशातील 4,216 लोक कोरोनाला पराभूत करून निरोगी झाले, तर 10 जणांचा संसर्गामुळे मृत्यू झाला.

Advertisement

देशात 103 दिवसांनंतर, एका दिवसात कोविड-19 चे 8,000 हून अधिक नवीन रुग्ण आढळून आल्याने, एकूण संसर्ग प्रकरणांची संख्या 4,32,13,435 वर पोहोचली आहे, तर सक्रिय रुग्णांची संख्या 40,370 वर पोहोचली आहे.

Advertisement

जूनमध्ये चिंता वाढली
देशातील एकूण सक्रिय कोरोना प्रकरणांबद्दल बोलायचे तर, सध्या हा आकडा 40,370 आहे. याआधी शुक्रवारी 8,263 नवीन बाधित आढळले होते, तर गुरुवारी देशात 7,584 रुग्ण आढळले होते. मंगळवारी (7 जून) जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, 24 तासांत कोरोना विषाणूच्या संसर्गाची 3714 प्रकरणे समोर आली आहेत. रविवारी (5 जून) देशात 4,270 कोविड रुग्णांची नोंद झाली आणि सोमवारी (6 जून) ही संख्या 4,518 वर पोहोचली.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Loading...
Advertisement

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोना विषाणूचे एकूण 8,329 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत, तर आणखी 10 रुग्णांच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या 5,24,757 झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या संसर्गाच्या एकूण प्रकरणांपैकी 0.09 टक्के आहे, तर कोविड-19 मधून बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.69 टक्के नोंदवला गेला आहे.

Advertisement

कोरोना बुलेटिन
आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोविड-19 च्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत 4,103 प्रकरणांची नोंद झाली आहे. संसर्गाचा दैनंदिन दर 2.41 टक्के आणि साप्ताहिक संसर्ग दर 1.75 टक्के नोंदवला गेला. या आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या 4,26,48,308 झाली आहे, तर मृत्यूचे प्रमाण 1.21 टक्के आहे. देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 192.92 कोटी डोस देण्यात आले आहेत.

Advertisement

2 राज्यांमध्ये टेन्शन वाढला
गेल्या काही दिवसांपासून भारतातील महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांमध्ये कोविड-19 चे रुग्ण अचानक वाढू लागले आहेत, त्यामुळे तज्ज्ञांचे टेन्शन वाढले आहे. केवळ केरळ आणि महाराष्ट्रात सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाने जोर पकडला आहे. गेल्या 24 तासांत येथे कोरोनाचे 3,081 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, जे गेल्या चार महिन्यांतील सर्वाधिक आहे. महाराष्ट्रानंतर केरळचा दुसरा क्रमांक लागतो. जिथे दररोज 2000 हून अधिक नवीन कोरोना रुग्ण आढळत आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply