Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. ‘या’ गोलंदाजाला टीम इंडियात मिळाली नाही 6 वर्षात एकही संधी; अन् आता..

मुंबई –  क्रिकेटच्या (Cricket) इतिहासात असे अनेक महान गोलंदाज झाले आहेत, ज्यांनी मैदानावर अनेक विक्रमांची नोंद केली आहे. तशाच प्रकारे भारतीय क्रिकेट (Team India) संघाच्या गोलंदाजांनीही आपल्या वेगाची आणि कौशल्याची नांगी जगभर वाजवली आहे. 2011 मध्ये देखील भारतीय क्रिकेट संघात एका जीवघेण्या गोलंदाजाने प्रवेश केला होता, या गोलंदाजाने आपल्या वेगाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते, मात्र गेल्या 6 वर्षांपासून या खेळाडूला एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.

Advertisement

सहा वर्षे संघात संधी मिळाली नाही
आजच्या काळात भारताकडे अनेक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज आहेत ज्यांनी आपल्या आक्रमकतेने जगभरातील फलंदाजांना हैराण केले आहे. या गोलंदाजांमध्ये वरुण आरोनच्या (Varun Aaron) नावाचाही समावेश आहे. या गोलंदाजाने 2011 मध्ये टीम इंडियात प्रवेश केला होता. वरुण आरोनने 2011 मध्ये इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले होते. मात्र त्यानंतर झालेल्या दुखापतीने त्याला खूप त्रास दिला. मात्र, त्याने हार मानली नाही आणि 2014 च्या न्यूझीलंड दौऱ्यावर त्याचा संघात समावेश करण्यात आला. पण 2015 नंतर त्याला टीम इंडियासाठी एकही सामना खेळायला मिळालेला नाही.

Advertisement

टीम इंडियात गोंधळ
वरुण आरोनने आपल्या करिअरची सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने केली. अ‍ॅरॉनने आपल्याच गतीने मोठ्या फलंदाजांची शिकार केली होती. मात्र या खेळाडूच्या कारकिर्दीचा आलेख पूर्णपणे खाली जाऊ लागला. वरुण आरोनने टीम इंडियासाठी 9 कसोटी सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर 9 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 11 विकेट घेतल्या आहेत. क्रिकेटपंडित त्याच्यावर भारतीय संघात बराच वेळ लक्ष ठेवून होते. मात्र त्यानंतर झालेल्या दुखापतीने त्याला खूप त्रास दिला.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

आयपीएल 2022 मध्ये संधी मिळाली
वरुण आरोनचे क्रिकेट करिअर आता संपण्याच्या मार्गावर आहे कारण वरुण बराच काळ टीम इंडियातून बाहेर आहे. वरुण आरोन हा IPL 2022 मध्ये गुजरात टायटन्सचा (GT) भाग होता. त्याला या मोसमातील पहिल्याच सामन्यात खेळण्याची संधीही मिळाली, पण हा मोसमही त्याच्यासाठी खास नव्हता. या मोसमात त्याने 2 सामने खेळले आणि 10.40 च्या इकॉनॉमीने फक्त 2 विकेट घेतल्या. वरुण आरोनने आयपीएलमध्ये 52 सामने खेळले असून 8.94 च्या इकॉनॉमीने 44 विकेट घेतल्या आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply