मुंबई – टीम इंडिया (Team India)T20 क्रिकेटमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. 9 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) होणारा पहिला T20 सामना टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. या सामन्यात टीम इंडिया विश्वविक्रम करू शकते. टीम इंडियाला हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकायचा आहे.
टीम इंडिया विश्वविक्रमापासून एक पाऊल दूर
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना टीम इंडियासाठी ऐतिहासिक सामना ठरू शकतो. टीम इंडियाने हा सामना जिंकला तर टी-20 क्रिकेटमध्ये सलग 13 सामने जिंकणारा पहिला संघ बनेल. हा विश्वविक्रम करण्यासाठी टीम इंडियाला आफ्रिकेला कोणत्याही परिस्थितीत हरवावे लागणार आहे. आतापर्यंत अफगाणिस्तान आणि रोमानियाच्या संघाने टी-20 मध्ये सलग 12 सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे.
टीम इंडियासाठी हा सामना जिंकणे इतके सोपे असणार नाही. या मालिकेतील संघाची कमान केएल राहुलच्या हाती आहे. केएल राहुलने कर्णधार म्हणून आतापर्यंत एकही सामना जिंकलेला नाही. त्याने 4 सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले असून या सामन्यांमध्ये संघाला फक्त पराभवच मिळाला आहे. विशेष म्हणजे केएल राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने हे सर्व सामने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच खेळले आहेत.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
टीम इंडियाला पराभवाचा बदला घ्यायचा आहे
T20 मालिकेतील पाच सामने 5 वेगवेगळ्या ठिकाणी खेळवले जातील. दोन्ही संघांमधील ही टी-20 मालिका खूपच रोमांचक होणार आहे. गेल्या वर्षी आफ्रिका दौऱ्यावर भारताला कसोटी मालिकेत 2-1 आणि वनडे मालिकेत क्लीन स्वीपसह पराभवाला सामोरे जावे लागले होते. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची भारताला चांगली संधी आहे.