मुंबई – देशातील जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांनी भारतीय जनता पक्षावर (BJP) निशाणा साधला आहे. पटोले नागपुरात म्हणाले की, भाजपला देशात जातीवर आधारित जनगणना करायची नाही कारण ते धर्माच्या आधारे राजकारण करते. त्याचवेळी त्यांनी या मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आणि सांगितले की, देशात जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे, असे त्यांचा पक्ष नेहमीच सांगत आला आहे. यामुळे देशातील अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.
यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी राज्यात जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली होती. बिहारमध्ये जनगणनेसोबतच आर्थिक सर्वेक्षणही केले जाणार आहे. 2 जून रोजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. बिहार सरकार आपल्या संसाधनांच्या जोरावर हे काम करेल. या गणनेच्या आधारे फेब्रुवारी 2023 पर्यंत मसुदा तयार केला जाईल.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
नितीश कुमार म्हणाले की, यास एक महिना लागेल. संबंधित विभागाने तयारी सुरू केली आहे. लवकरच काम सुरू होईल. याबाबत इतर पक्षांना माहिती देत राहीन आणि त्यांच्याकडून सूचना घेत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हे सर्व समुदायांच्या हिताचे आहे, असे बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.
कर्नाटकात या नावाने जात जनगणना झाली होती
जात जनगणनेबाबत कर्नाटक मॉडेलचा उल्लेख करण्यात आला आहे. कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारने 2014 मध्ये जात जनगणना सुरू केली. याला विरोध झाल्यावर हे नाव बदलून सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण करण्यात आले. 2017 साली हा अहवाल आला होता, मात्र तो आजतागायत सार्वजनिक करण्यात आलेला नाही. यामध्ये 195 हून अधिक नवीन जाती उदयास आल्याचे त्याचे कारण मानले जाते.