Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भाजप नेते मोहित कंबोज यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ प्रकरणात मुंबई पोलिसांनी दाखल केला गुन्हा

मुंबई –   मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आर्थिक गुन्हे शाखेने भाजप नेते (BJP Leader) मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्याविरोधात बँक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेकडून (IOB) 52 कोटींचे कर्ज घेऊन ते पैसे बुडवल्याचा आरोप मोहित कंबोजवर आहे. मुंबई पोलिसांच्या ईओडब्ल्यू शाखेने याप्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. मोहित कंबोजशिवाय त्याच्या अन्य दोन साथीदारांवरही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनुसार, भाजप नेते मोहित कंबोज आणि त्यांच्या इतर दोन साथीदारांनी एक कंपनी सुरू केली होती. या कंपनीसाठी त्यांनी इंडियन ओव्हरसीज बँकेकडून 2011 ते 2015 या कालावधीत 52 कोटींचे कर्ज घेतले. परंतु ज्या कारणासाठी हे कर्ज घेतले होते, त्याच कारणासाठी त्याचा वापर करण्यात आला नाही. बँकेतून घेतलेले कर्ज इतरत्र वापरून ही संपूर्ण रक्कम बुडवली.

Advertisement

बँक व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल
याप्रकरणी इंडियन ओव्हरसीज बँकेच्या व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून मोहित कंबोज व्यतिरिक्त त्यांच्या कंपनीच्या आणखी दोन संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, मोहित कंबोजने ट्विट करून हे आरोप फेटाळून लावले आहेत. मोहितने ट्विट केले की, मला कळले आहे की मुंबई पोलिसांनी माझ्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. 2017 मध्ये बंद पडलेल्या जुन्या कंपनीचे जुने बँक इश्यू काढून माझ्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

कायदेशीर लढाई लढून न्याय मिळेल

Loading...
Advertisement

मोहित कंबोजने पुढे लिहिले की, मला असे वाटते की महाराष्ट्राचे महाविकास आघाडी सरकार माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे किंवा असे करून मला धमकावत आहे. हा संजय राऊत यांचा बदला आहे की नवाब मलिक यांचा, असा सवाल उपस्थित करत ते म्हणाले. याविरोधात मी न्यायालयात कायदेशीर लढाई लढणार असून दूध का दूध, पानी का पानी करणार आहे.

Advertisement

मोहित कंबोज यांनी नवाब मलिक यांच्यावर लावले होते गंभीर आरोप

Advertisement

यापूर्वी, मोहित कंबोज यांनी अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला होता आणि टेटर फंडिंग प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक सध्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहेत. दरम्यान, मोहित कंबोज यांच्यावर बँक फसवणुकीचा हा गुन्हा दाखल झाल्याने भाजप कार्यकर्ते हे सूडबुद्धीचे कृत्य म्हणत आहेत.

Advertisement

मोहित कंबोज यांच्या घरावर यापूर्वीही छापा
याआधीही जून 2020 मध्ये 57 कोटींच्या बँक फसवणुकीच्या प्रकरणात सीबीआयने पाच ठिकाणी छापे टाकले होते. या एकाच ठिकाणी मोहित कंबोज यांचे वास्तव्य होते. त्यावेळी मोहित कंबोज हे मुंबई भाजपचे सरचिटणीस होते. बँक ऑफ इंडियाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे सीबीआयने हा छापा टाकला होता.

Advertisement
Advertisement

Leave a Reply