Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IPL 2022 विजेतेपद जिंकणारा संघ होणार मालामाल; जाणून घ्या कोणत्या संघाला किती मिळणार बक्षीस

मुंबई – आयपीएल (IPL) ही जगातील सर्वात मोठी लीग आहे, या लीगमध्ये दरवर्षी क्रिकेट जगतातील मोठे खेळाडू खेळायला येतात. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंवर करोडो रुपये खर्च केले जातात, पण आयपीएल विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला किती बक्षीस रक्कम दिली जाते हे तुम्हाला माहिती आहे का? आयपीएलमध्ये चॅम्पियन बनणाऱ्या संघापासून ते चौथ्या स्थानापर्यंतच्या संघाला बक्षिसाची रक्कम दिली जाते, आयपीएल 2022 मध्ये कोणता क्रमांकाचा संघ इतका श्रीमंत असेल ते आम्ही तुम्हाला सांगतो.

Advertisement

आयपीएल 2022 चा चॅम्पियन होणार मालामाल
इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) चा अंतिम सामना गुजरात टायटन्स (GT) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात खेळवला जाईल. या सामन्यातील विजेत्या संघाला 20 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम (IPL 2022 price money) दिली जाईल. जगभरात खेळल्या जाणार्‍या वेगवेगळ्या टी-20 लीगमध्ये हा सर्वाधिक आहे. अंतिम फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला 13 कोटी रुपये दिले जातील, गेल्या वर्षी ही रक्कम 12.5 कोटी रुपये होती. IPL 2022 मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर असलेल्या संघांना 7-7 कोटी रुपये देखील दिले जातील.

Advertisement

बाकी लीगच्या तुलनेत आयपीएल खूप पुढे
एवढी बक्षीस रक्कम जगभरात खेळल्या जाणार्‍या कोणत्याही वेगवेगळ्या T20 लीगमध्ये दिली जात नाही. इंडियन प्रीमियर लीग (IPL) नंतर कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक बक्षीस रक्कम आहे. कॅरेबियन प्रीमियर लीग (CPL) चे विजेतेपद जिंकणाऱ्या संघाला 7.5 कोटी रुपये दिले जातात. त्याच वेळी, पाकिस्तान सुपर लीग (PSL) पेक्षा बांगलादेश प्रीमियर लीग (BPL) मध्ये अधिक बक्षीस रक्कम दिली जाते. बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये 6.34 कोटी रुपये आणि पाकिस्तान सुपर लीगमध्ये 3.73 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम उपलब्ध आहे.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

पहिल्या सत्रात इतकी होती बक्षीस रक्कम 
आयपीएल 2008 मध्ये सुरू झाले आणि हा 15 वा हंगाम खेळला जात आहे. आयपीएल ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी क्रिकेट लीग आहे. आयपीएलच्या पहिल्या सत्रात फायनल जिंकणाऱ्या संघाला 4.8 कोटी रुपये मिळाले होते. ही बक्षीस रक्कम आता जवळपास चौपट वाढली आहे. गतवर्षी जेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला 20 कोटी रुपये देण्यात आले होते, यंदाही ही बक्षीस रक्कम तशीच ठेवण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply