Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

महाविकास आघाडीमध्ये फूट?; शिवसेना नेत्याचा धक्कादायक विधान, अनेक चर्चांना उधाण

मुंबई –  मागच्या काही दिवसांपासून राज्यातील महा विकास आघाडी सरकारमधील (MVA) तिन्ही पक्षातील नेते एकमेकांवर जाहीर टीका करताना दिसत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. यातच आता पुन्हा एकदा शिवसेनेचे (Shiv Sena) नेते विकास गोगावले यांनी धक्कादायक विधान केला आहे.

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस हेच शिवसेनेचे खरे शत्रू आहेत, भाजपचे नाही, अशी टीका शिवसेना (युवा विभाग) नेते विकास गोगावले यांनी गुरुवारी केली.

Advertisement

गोगावले म्हणाले की, परिसरात भाजपची मतांची टक्केवारी कमी आहे.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

गोगावले म्हणाले, “आम्ही आमच्या पक्षाचा येथे विस्तार करत आहोत. महाड तालुक्यात भाजपची मतांची टक्केवारी कमी आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे श्रेय घेत असल्याने येथे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष आमचे खरे शत्रू आहेत.” ते पुढे म्हणाले की, युती संपवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे चार माजी नगरसेवक आणि शिवसेनेच्या एका नगरसेवकाने गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आम्ही आमची आघाडी वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत, पण ते बिघडवण्याचे काम करत आहेत, असे ते म्हणाले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply