Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

किंग कोहलीने रचला इतिहास; ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

मुंबई –  आयपीएल 2022 चा (IPL 2022) थरार शिगेला पोहोचला आहे, सर्व संघ एकमेकांविरुद्ध विजय मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण विजय त्याच संघाचा होत आहे, ज्याची कामगिरी उत्कृष्ट आहे. आयपीएलच्या या मोसमातील 67 वा सामना काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात झाला. आरसीबीच्या (RCB) संघाने हा सामना 8 गडी राखून जिंकला. संघाचा अनुभवी विराट कोहलीने (Virat Kohli) आरसीबीच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. यासह विराट कोहलीने एक विक्रम केला आहे.

Advertisement

विराट कोहलीने काल गुजरात टायटन्सविरुद्ध शानदार फलंदाजी केली. विराट कोहलीची फलंदाजी पाहून चाहते खूप खुश झाले आहेत. विराट कोहलीने 54 चेंडूत 73 धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमध्ये 8 चौकार आणि 2 षटकार दिसले. विराट कोहलीच्या या शानदार खेळीमुळे त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले.

Advertisement

विराट कोहलीच्या 73 धावांमुळे तो RCB संघाकडून खेळताना 7000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला. विराट कोहलीने आता चॅम्पियन्स लीगसह आरसीबीच्या संघासोबत खेळताना 7016 धावा केल्या आहेत.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

विराट कोहलीच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर विराट कोहलीने आयपीएलच्या 221 सामन्यांच्या 213 डावांमध्ये 6592 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये विराट कोहलीने 5 शतके आणि 44 अर्धशतके झळकावली आहेत. IPL 2022 मध्ये विराट कोहलीने 14 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 309 धावा झाल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 2 अर्धशतके झळकली आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply