मुंबई – रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्धच्या दारुण पराभवानंतर गुजरात टायटन्सचा (GT) कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आपल्याच संघावर भडकला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्ध गुरुवारी झालेल्या IPL 2022 सामन्यात गुजरात टायटन्स (GT) ला 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.
गुजरातच्या पराभवामुळे हार्दिक पांड्या संतापला
गुजरात टायटन्स (GT) संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)समोर हतबल दिसत होता. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या पराभवानंतर सांगितले की, त्यांचा संघ 10 धावांनी मागे राहिला.
बंगळुरूकडून पराभवाचे हे मोठे कारण सांगितले
सामना संपल्यानंतर हार्दिक पंड्याने आपल्या संघाच्या पराभवाचे कारण सांगताना सांगितले की, ‘आम्ही शेवटी दहा धावांनी मागे राहिलो. ग्लेन मॅक्सवेलने आपल्या ओळखीच्या शैलीत फलंदाजी केली. आम्ही योग्य मार्गावर होतो, पण सलग दोन विकेट गमावल्याने गती खंडित झाली. प्लेऑफमध्ये सतत विकेट्स न गमावण्याचा धडा यातून मिळाला.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
आरसीबीला आता दिल्लीच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागणार
हार्दिक पांड्या म्हणाला, ‘धावा करणे नेहमीच चांगले वाटते. खेळाडूंमध्ये चांगला समन्वय असून हा सामना आमच्यासाठी धडा ठरला आहे.प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आरसीबीला आता दिल्ली-मुंबई यांच्यातील सामन्यात दिल्लीच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागणार आहे.