Take a fresh look at your lifestyle.

RCB vs PBKS: किंग कोहली आज ठोकणार शतक ! अनेक चर्चांना उधाण; जाणून घ्या डिटेल्स

मुंबई –  IPL-2022 मध्ये विराट कोहलीच्या (Virat Kohli) बॅटने आतापर्यंत काही खास कामगिरी केलेली नाही. स्थिती अशी आहे की या स्पर्धेत आतापर्यंत तीनवेळा शून्यावर विकेट पडल्या आहेत. त्याच्या कामगिरीवरही बरीच टीका होत आहे.

Advertisement

त्याचवेळी आज (शुक्रवारी) त्याचा संघ आरसीबीचा (RCB) पंजाब किंग्जसोबत (PBKS) सामना आहे. प्लेऑफसाठी आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. आज कोणताही संघ हरला तरी त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचणे जवळपास अशक्य होईल. आरसीबीच्या चाहत्यांच्या नजरा आरसीबीच्या विजयावर तसेच विराट कोहलीच्या बॅटवर असतील. विराट कोहली आज किती धावा करेल हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

आजच्या सामन्यात विराट कोहली शतक झळकावणार आहे. नाही-नाही, हे आम्ही म्हणत नसून हा अंदाज सोशल मीडियावर (Social media) त्याचे चाहते व्यक्त करत आहेत. खरं तर, सामन्याला अवघे काही तास शिल्लक असताना विराट कोहलीच्या काही चाहत्यांनी सोशल मीडियावर दावा केला आहे की, तो आज पंजाबविरुद्ध शतक झळकावणार आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्याची अलीकडची कामगिरी पाहता आणि त्याचा फॉर्म पाहता ही गोष्ट खूप अवघड वाटते पण चाहत्यांसाठी खास गोष्ट म्हणजे त्यांच्या अपेक्षा नेहमीच गगनाला भिडलेल्या असतात.

Advertisement

IPL 2022 मध्ये विराट कोहलीने आतापर्यंत 12 सामन्यांमध्ये फक्त 216 धावा केल्या आहेत. यामध्ये तो तीन वेळा शून्यावर बाद झाला.

Advertisement
Advertisement

Leave a Reply