Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अन्..’त्या’ प्रकरणावरून राज ठाकरे उद्धव ठाकरेंवर भडकले; म्हणाले, आमच्या संयमाची..

मुंबई –  महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पक्षाचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्रातील (Maharashtra) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्रास देत असल्याचा आरोप केला आहे. उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात राज ठाकरे म्हणाले की, आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका, कारण सत्ता येते आणि जाते. मशिदींमध्ये लपवलेली शस्त्रे जप्त करण्याची आणि दहशतवाद्यांना पकडण्याची तत्परता सरकार आणि पोलिसांनी दाखवली होती का, असा टोला ठाकरे यांनी लगावला.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Loading...
Advertisement

मंगळवारी राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. सोशल मीडियावर पत्र प्रसिद्ध करत ते लिहितात, “राजकारणात कोणीही कायम सत्तेत राहत नाही. सत्ता येते आणि सत्ता जाते. तुमच्यासोबत असली तरी ती कायम टिकत नाही….”

Advertisement

राज ठाकरे पुढे लिहितात, “महाराष्ट्र सरकार राज्य पोलीस दलाच्या माध्यमातून ज्या प्रकारे मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेत आहे, त्यांचा छळ केला जात आहे, ते योग्य नाही… सरकार आणि पोलीस मशिदींमध्ये लपून बसले होते का? शस्त्रे आणि दहशतवाद्यांना पकडण्यासाठी?अशी कारवाई करण्यात आली होती का?” असं प्रश्न देखील त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply