‘त्या’ दौऱ्यावरून संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल ; म्हणाले, खोट्या विश्वासाने ..
मुंबई- मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्यावर शिवसेना(Shiv sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी खरपूस समाचार घेतला आहे. संजय राऊत म्हणाले की, राजकीय कारणांसाठी आणि खोट्या विश्वासाने येणाऱ्यांना भगवान राम आशीर्वाद देत नाहीत. राम लल्लाच्या दर्शनासाठी राज ठाकरे 5 जूनला अयोध्येला जाणार आहेत.
गेल्या महिन्यात राज ठाकरे यांनी मशिदींमधील लाऊडस्पीकरच्या वापरावर प्रश्न उपस्थित करून हा राष्ट्रीय मुद्दा बनवला होता. दरम्यान, राम लल्लाच्या दर्शनासाठी 5 जूनला अयोध्येला जाणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले होते.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
राज ठाकरेंनंतर आदित्य ठाकरेही अयोध्येला पोहोचणार आहेत
राज ठाकरे अयोध्येला जाण्याच्या घोषणेसोबतच महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनीही अयोध्येला जाण्याची घोषणा केली होती. संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार, आदित्य ठाकरे 10 जूनच्या आसपास अयोध्येला जाऊ शकतात. संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्राव्यतिरिक्त देशभरातील अनेक शिवसैनिकही आदित्य ठाकरेंसोबत अयोध्येला जाणार आहेत.
आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत संजय राऊत म्हणाले की, अयोध्या दौरा हा राजकीय नसून आमच्यासाठी श्रद्धेचा आहे. ते म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना अयोध्येत येऊन हिंदुत्वाचा खरा अर्थ जगाला सांगण्यासाठी समाजातील अनेक घटकांकडून निमंत्रण मिळाले आहे.
खोट्या श्रद्धेने येणाऱ्यांना भगवान राम आशीर्वाद देत नाहीत
यादरम्यान राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत संजय राऊत म्हणाले जे लोक त्यांच्या दरबारात बनावट भावनेने राजकारण करायला येतात त्यांना भगवान राम आशीर्वाद देत नाहीत. अशा लोकांचा विरोध होणे साहजिकच आहे.
भाजप खासदाराचे राज ठाकरेंना आव्हान
दुसरीकडे, भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करत, जोपर्यंत राज ठाकरे त्यांच्या कृत्याबद्दल उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही, असं म्हटलं आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांनीही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना राज ठाकरे उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना भेटू नका, असे आवाहन केले होते.