Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IPL वर पुन्हा कोरोना संकट; आता ‘या’ खेळाडूला झाली लागण

मुंबई –  IPL 2022 मध्ये दुसऱ्यांदा कोरोनाची (Corona) प्रकरणे समोर आली आहेत. यावेळीही दिल्लीतील (Delhi capitals) एका खेळाडूचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर दिल्ली (DC) आणि चेन्नई (CSK) यांच्यातील सामन्याबाबत साशंकता आहे. याआधीही दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमध्ये कोरोनाची अनेक प्रकरणे समोर आली होती, मात्र स्पर्धेत त्याचा फारसा परिणाम झाला नाही. दिल्लीच्या कॅम्पमध्ये कोरोनाचे प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण टीम आयसोलेटेड झाली आहे. मात्र, ज्या खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे तो नेट बॉलर आहे आणि तो मुख्य संघाचा भाग नाही ही दिल्लीसाठी दिलासादायक बाब आहे.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

दिल्लीच्या संघाला आज संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर 11 वा सामना खेळायचा आहे, मात्र संपूर्ण संघ आयसोलेशनमध्ये असल्याने या सामन्याबाबत साशंकता आहे. रविवारी सकाळी सर्व खेळाडूंची चाचणी घेण्यात आली असून त्यांना त्यांच्या खोलीत राहण्यास सांगण्यात आले आहे. या तपासणीचा अहवाल आल्यानंतरच दिल्ली आणि चेन्नई यांच्यातील सामन्याबाबत कोणताही निर्णय घेतला जाईल.

Loading...
Advertisement

दिल्लीचा संघ दुसऱ्यांदा आयसोलेटेड
आयपीएल 2022 मध्ये दिल्लीचा संघ आयसोलेटेड पडण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी, टीम फिजिओ पॅट्रिक फरहार्ट, अष्टपैलू मिचेल मार्श, कीपर-फलंदाज टीम सेफर्ट आणि तीन सपोर्ट स्टाफसह संघातील सहा सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते. त्यामुळे पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यातही बदल करण्यात आला. आधी हा सामना पुण्यात खेळवला जाणार होता, पण नंतर तो मुंबईत झाला.

Advertisement

सामना वेळेवर होऊ शकतो
दिल्ली आणि चेन्नई यांच्यातील सामन्याबाबत बीसीसीआयकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्समध्ये दिल्लीच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हा सामना नियोजित वेळी आणि ठिकाणी होऊ शकतो. नेट बॉलरच्या संसर्गामुळे संघात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही.

Advertisement

दिल्ली कॅपिटल्समध्ये कोरोनाची प्रकरणे कधी आणि कुठे आली
गेल्या काही दिवसांत दिल्ली संघात कोरोनाचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. 15 एप्रिल रोजी, संघाचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट प्रथम कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. यानंतर, 16 एप्रिल रोजी दिल्लीचे स्पोर्ट्स मसाज थेरपिस्ट चेतन कुमार यांनाही संसर्ग झाला होता. 18 एप्रिल रोजी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्श, टीम डॉक्टर अभिजित साळवी, सोशल मीडिया कंटेंट टीम मेंबर आकाश माने यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. 20 एप्रिल रोजी दिल्लीच्या संघाचा आणखी एक खेळाडू न्यूझीलंडच्या टीम सेफर्टला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले होते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply