मुंबई – मागच्या काही दिवसांपासून देशाच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेले मनसेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) येत्या 5 जूनला आयोध्याच्या दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी मनसे पदाधिकाऱ्यांकडून जोरात तयारी देखील सुरू झाली आहे. मात्र नुकताचसमोर आलेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांचा हा दौरा वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.
याचा मुख्य कारण म्हणजे भाजप (BJP) खासदार ब्रिजभूषण शरण सिंह( Brij Bhushan Sharan Singh) यांनी राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्यापूर्वीच त्यांना इशारा दिला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांना आम्ही अयोध्येत येऊ देणार नाही अशी धमकी दिली आहे.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
ते म्हणाले की, राज ठाकरेंनी आधी हात जोडून सर्व उत्तर भारतीयांची माफी मागावी. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.राज ठाकरे ५ जूनला अयोध्येला येणार आहेत. ‘अयोध्या चलो’चे पोस्टर्स मुंबईत लावण्यात आले आहेत.
राज ठाकरे हे महाराष्ट्रातील उद्धव सरकारवर सतत हल्लाबोल करत आहे आणि ते लवकरच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेऊ शकतात.