Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

संजय राऊत केंद्रावर संतापले; म्हणाले,’त्या’ नेत्यांना गुजरातमध्ये एन्ट्री मात्र…

मुंबई – शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी परदेशी नेत्यांना गुजरातमध्ये घेऊन जाणाऱ्या केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनामधील आपल्या साप्ताहिक स्तंभात राऊत यांनी पीएम मोदी (PM Modi) आणि भाजप सरकारवर टीका केली आहे की, व्यवसायाची राजधानी मुंबईचे (Mumbai) पंख छाटण्याचा सतत प्रयत्न केला जात आहे असं ते म्हणाले.

Advertisement

विविध मुद्द्यांवरून राज्यात सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिनानिमित्त बोलताना संजय राऊत म्हणाले की, केंद्रातील भाजप नेतृत्वाला भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान विसरले आहे. ज्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींना पहिला लाता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला त्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना का बोलवण्यात आले नाही असा सवाल संजय राऊत यांनी केला.

Advertisement

महाराष्ट्राला राष्ट्रीय राजकारणातून बाहेर काढण्याची ही प्रक्रिया असल्याचे राऊत म्हणाले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जागतिक नेते मुंबईत येत नसल्याने त्यांना आधी गुजरात आणि नंतर दिल्लीला नेले जाते, असा आरोप राऊत यांनी केला. राऊत यांनी लिहिले, ‘काही आठवड्यांपूर्वी शरद पवार जी यांनी दुःख व्यक्त केले होते की, पंतप्रधान मोदी जागतिक नेत्यांना गुजरातला घेऊन तेथील विकास दाखवतात.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

शरद पवार जेव्हा असे मुद्दे मांडतात तेव्हा त्यांचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. संजय राऊत यांनी आपल्या संपादकीयमध्ये लिहिले आहे की, ‘पीएम मोदी संपूर्ण देशाचे पीएम आहेत, अजून बरीच शहरे आहेत.’ माजी मुख्यमंत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत संजय राऊत म्हणाले की, मुंबई शिवसेना नसती तर तो केंद्रशासित प्रदेश झाला असता असं आरोप देखील त्यांनी केला आहे.

Advertisement

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत मशिदींतील लाऊडस्पीकर काढले नाही तर त्यांचे कार्यकर्ते हनुमान चालीसा वाजवतील, अशी धमकी राज्य सरकारला दिली होती. या वादावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी शिवसेनेवर फुलांचा वर्षाव केला असता.

Advertisement
Advertisement

Leave a Reply