Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

हनुमान चालिसा वाद; जाती-धर्मावर शरद पवारांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, टीव्ही ..

मुंबई –   हनुमान चालीसाच्या (Hanuman chalisa) वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज विधान केले आहे. ते मुंबईत म्हणाले, ‘आज तुम्ही टीव्ही चालू केला तर अनेकजण मीटिंग बोलवणार असल्याचे सांगतात तर कोणी हनुमान चालीसा पठण करण्याची मागणी करतात. हे सर्व प्रश्न तुमच्या मूलभूत गरजा सोडवतील का? याचा सामना करण्यासाठी आपल्याला शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावर चालावे लागेल.

Advertisement

जात-धर्माच्या नावाखाली देशाला मागास नेण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून होत असल्याचे पाहायला मिळत आहे. लोकांच्या मूलभूत गरजा काय आहेत? महागाई, अन्न, बेरोजगारी. पण कोणीही काळजी घेत नाही. असं शरद पवार म्हणाले.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Loading...
Advertisement

पवारांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचीही भेट घेतली
उल्लेखनीय आहे की, नुकतीच शरद पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती. या बैठकीनंतरच पवारांचे वक्तव्य समोर आले आहे. मात्र, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात राणा दाम्पत्याशी संबंधित वाद (अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा आणि त्यांचे पती रवी राणा) आणि मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवण्याची राज ठाकरेंची मागणी यासह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले आहे.

Advertisement

नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी 23 एप्रिल रोजी सकाळी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केली होती. यानंतर हजारो शिवसैनिक तेथे जमले होते, त्यामुळे राणा दाम्पत्य आपल्या घोषणेवर ठाम राहू शकले नाही. मात्र, नंतर राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली.

Advertisement
Advertisement

Leave a Reply