मुंबई : दिव्यांग मुले व युवकांच्या ‘दिव्य कला शक्ती : दिव्यांगतेतून क्षमतांचे दर्शन’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नेहरू केंद्र येथे झाले. यावेळी त्यांनी म्हटले की, पूर्वी अपंग व्यक्तींमध्ये न्यूनगंडाची भावना असायची. अंगभूत प्रतिभेची जाणीव करून दिल्यामुळे दिव्यांगांमध्ये आज नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. दिव्यांगांची सेवा ही ईशसेवा मानून विविध समाज घटकांनी कार्य केल्यास व दिव्यांगांची शक्ती राष्ट्रकार्यासाठी वापरल्यास देश निश्चितपणे अधिक प्रगती करेल.
Agriculture News: उत्पादनवाढीसाठी गरज आहे ‘त्याची’ही; पहा नेमके काय म्हटलेय तज्ञांनी https://t.co/REOz0LWqim
Advertisement— Krushirang (@krushirang) April 26, 2022
Advertisement
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागातर्फे मुंबईच्या अली यावर जंग राष्ट्रीय वाक् व श्रवण दिव्यांगजन संस्थेच्या सहकार्याने ‘दिव्य कला शक्ती’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘दिव्य कला शक्ती’ या सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, दमण व दीव येथील दीडशे पेक्षा अधिक दिव्यांग मुले व युवक भाग घेत आहेत. आज दिव्यांग मुले सामान्य मुलांच्या कुठेही मागे नाहीत. दिव्यांग युवक-युवती मल्ल्लखांब प्रशिक्षण घेत आहेत; युद्धात हात पाय गमावलेले दिव्यांग जवान तोंडाच्या मदतीने सुंदर चित्रे काढताना आपण पाहिले आहेत. दिव्यांग क्रीडापटूंचे पॅरालिम्पिकमध्ये देशासाठी पदके प्राप्त करण्यात मोठे योगदान आहे, असे राज्यपालांनी सांगितले. (Divya Kala Shakti: Witnessing the Abilities in Disabilities’ at Nehru Centre in Mumbai, Maharashtra, Goa, MP, Gujarat, Chhattisgarh, Daman & Diu participated in this event)