Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

धवनने रचला इतिहास; विराटनंतर ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा फलंदाज

मुंबई –  IPL 2022 चा थरार शिगेला पोहोचला आहे, सर्व संघ एकमेकांशी स्पर्धा करून जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. आयपीएलच्या या हंगामात दोन नवीन संघही सहभागी झाले आहेत. या संघांच्या समावेशामुळे चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. आयपीएलच्या या हंगामातील 38वा सामना पंजाब किंग्ज (PBKS) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. CSK ने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबचा संघ प्रथम फलंदाजी करत आहे. पंजाबचा सलामीवीर शिखर धवनने (Shikhar Dhawan) इतिहास रचला आहे.

Advertisement

आयपीएल 2022 च्या या सामन्यात पंजाब किंग्जचा सलामीवीर शिखर धवन दोन धावा करताच आयपीएलमध्ये 6000 धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. शिखर धवन आयपीएलचा 200 वा सामना खेळत आहे. शिखर धवनच्या नावावर 199 सामन्यात 5998 धावा होत्या. त्याने आपल्या 200 व्या सामन्यात हे स्थान गाठले आहे. या यादीत आरसीबीचा महान फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) पहिल्या क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नावावर 215 सामन्यांमध्ये 6402 धावा आहेत.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

IPL 2022 मध्ये शिखर धवनने आतापर्यंत 8 सामने   खेळले आहेत. यादरम्यान शिखर धवनच्या बॅटमधून 279 धावा झाल्या आहेत. शिखर धवनच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलताना शिखर धवनच्या बॅटने आयपीएलमधील 202 सामन्यांच्या 200 व्या डावात 6079 धावा केल्या आहेत. शिखर धवनने आयपीएलमध्ये 2 शतके आणि 46 अर्धशतके झळकावली आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply