मुंबई – राज्यात हनुमान चालिसावरुन (Hanuman chalisa) सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shiv Sena) प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधकांना थेट इशाराच दिला आहे. ते म्हणाले की, शिवसेनेपासून दूर राहा.
शनिवारी वडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याची योजना आखली होती.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार राऊत म्हणाले की, शिवसेना आणि मातोश्रीपासून दूर राहा अन्यथा परिणामांना सामोरे जा. ते म्हणाले, ‘मला सांगायचे आहे की शिवसेना आणि मातोश्रीच्या गोंधळात पडू नका, तुम्हाला 20 फूट खोल गाडले जाईल. मी हे कॅमेऱ्यासमोर बोलतोय, शिवसेनेच्या संयमाची परीक्षा घेऊ नका. राणांचा वापर इतर राजकीय पक्षांकडून होत असल्याचे ते म्हणाले.
शिवसेना कार्यकर्त्यांनी शनिवारी राणा दाम्पत्याच्या घराबाहेर जोरदार निदर्शने केली. राणा दाम्पत्याने मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. त्याचवेळी कारवाई करत मुंबई पोलिसांनी शनिवारीच नवनीत आणि रवी राणाला अटक केली.
आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा
ही अटक बेकायदेशीर
राणा दाम्पत्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी ही अटक बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. “दोघेही लोकसेवक (खासदार आणि आमदार) असल्याने ही अटक बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे. अटक करण्यापूर्वी स्पीकरची परवानगी घ्यायला हवी होती, पण परवानगी घेतली नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार कलम 41A अंतर्गत या प्रकरणी 14 दिवसांच्या आत नोटीस द्यावी, जी देण्यात आली नाही.
जर महाराष्ट्र सरकारने नवनीत आणि रवी राणा यांची सुटका केली नाही तर त्यांच्या सुटकेचे आदेश न्यायालयामार्फत मिळतील, असे ते म्हणाले.