Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

ठरलं! BCCI ने केली मोठी घोषणा; ‘या’ दोन शहरात होणार IPL प्लेऑफचे सामने

मुंबई – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI)  आयपीएल प्लेऑफ (IPL playoffs) सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले. प्लेऑफचे सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्स (Eden Gardens) आणि अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळवले जातील. त्याचवेळी लखनौच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर महिला चॅलेंजर्सचे आयोजन करण्यात येणार आहे.

Advertisement

क्वालिफायर-1 आणि एलिमिनेटर सामने कोलकातामध्ये होणार आहेत. क्वालिफायर 1 24 मे रोजी आणि अलिमेटर सामना 26 मे रोजी खेळवला जाईल. यानंतर क्वालिफायर-2 अहमदाबादमध्ये 27 मे रोजी होणार असून अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे. स्टेडियमच्या क्षमतेनुसार, चारही सामन्यांदरम्यान 100 टक्के प्रेक्षक सामना पाहू शकतात. कोलकाता येथे 26 मे रोजी होणारा एलिमिनेटर सामना जिंकणारा संघ दुसऱ्या दिवशी 27 मे रोजी होणाऱ्या क्वालिफायर-2 मध्ये खेळण्यासाठी सुमारे 1900 किलोमीटरचा प्रवास करेल.

Advertisement

24 ते 28 मे दरम्यान एकना स्टेडियमवर महिला चॅलेंजर्सचा सामना होणार आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) म्हणाले की “महिला चॅलेंजर्स मालिका 24 ते 28 मे दरम्यान लखनऊच्या एकना स्टेडियमवर होणार आहे. पुरुषांच्या आयपीएलच्या बाद फेरीतील सामने कोलकाता आणि अहमदाबाद येथे आयोजित केले जातील. 22 मे रोजी लीग फेरी संपल्यानंतर खेळल्या जाणार्‍या सामन्यांसाठी 100% उपस्थितीची परवानगी असेल.

Loading...
Advertisement

महाराष्ट्रात लीग फेरीचे सामने होत आहेत
आयपीएलच्या साखळी फेरी महाराष्ट्रातील चार मैदानांवर खेळल्या जात आहेत. मुंबईचे वानखेडे स्टेडियम, डी.वाय.पाटील स्टेडियम आणि ब्रेबॉर्न स्टेडियम व्यतिरिक्त पुण्याकडे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाण्याची परवानगी आहे.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

महिला चॅलेंजर्समध्ये तीन संघ खेळतात
महिला चॅलेंजर्स मालिकेत, ट्रेलब्लेझर्स, सुपरनोव्हास आणि वेग नावाने तीन संघ मैदानात उतरतात. सुपरनोव्हासने 2018 आणि 2019 मध्ये विजेतेपद पटकावले होते. 2020 मध्ये, ट्रेलब्लेझर्सचा संघ प्रथमच चॅम्पियन बनला. 2021 मध्ये कोरोनामुळे त्याचे आयोजन करण्यात आले नव्हते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply