Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अन्.. ‘त्या’ प्रकरणावरून नारायण राणे संतापले; शिवसेनेवर साधला निशाणा,म्हणाले रावणाला ..

मुंबई –  राज्यात सध्या हनुमान चालिसावरुन (Hanuman chalisa) वाद सुरू असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Union Minister Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर (CM Uddhav Thackeray)  निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात शिवसेना (Shivsena) , काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्या युतीबाबत राणे म्हणाले की, शिवसेनेचे नेते कुणासोबतही जाऊ शकतात. जर रावण आला आणि त्याला 5 वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली तर तोही त्याच्यासोबत जाईल. यासोबतच नवनीत राणा (Navneet Rana) यांना सुरक्षा देण्याबाबतही त्यांनी सरकारची बाजू घेतली.

Advertisement

राणे म्हणाले की “”शिवसेनेचे नेते कुणासोबतही जाऊ शकतात. जर रावण आला आणि त्याला 5 वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली तर तोही त्याच्यासोबत जाईल. जिथे सत्ता आणि पैसा आहे तिथे शिवसेना जाईल. त्याचवेळी महाराष्ट्रातील अपक्ष खासदार नवनीत राणा यांना केंद्राकडून वाय श्रेणीची सुरक्षा देण्याच्या प्रश्नावर राणे म्हणाले की, आम्ही सुरक्षा देऊ. आमच्या सुरक्षे पेक्षा चांगली सुरक्षा येऊ शकत नाही, असे राणे म्हणाले… ते (नवनीत राणा) लोकप्रतिनिधी आहेत. ते मला फक्त मदत करायला सांगतात.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

महाराष्ट्राचे अपक्ष आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी आणि खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची योजना न राबविण्याचा निर्णय त्यांनी शनिवारी घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था बिघडवायची नाही, असे ते म्हणाले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply