Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अन्.. राहुलची किंग कोहलीवर मात; ‘तो’ मोठा विक्रम मोडत रचला इतिहास

मुंबई –  IPL 2022 च्या 31 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा(LSG) कर्णधार के. एल.राहूलने(K.L.Rahul) एक मोठा विक्रम केला आहे. त्याने मंगळवारी (19 एप्रिल) मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्ध 24 चेंडूत 30 धावा केल्या. यादरम्यान राहुल टी20 मध्ये सर्वात जलद 6000 धावा करणारा भारतीय खेळाडू ठरला. त्याने भारत आणि आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) विक्रम मोडला.

Advertisement

राहुलने T20 च्या 166 व्या डावात सहा हजार धावा पूर्ण केल्या. यासाठी कोहलीने 184 डाव घेतले. वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ख्रिस गेल (Chris Gayle) आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) यांचा सर्वात वेगवान 6000 T20 धावांचा विक्रम मोडण्यात राहुल मुकला. ख्रिस गेलने 162 आणि बाबरने 165 डावात सहा हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

Advertisement

राहुलने 179 टी-20 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याच्या नावावर 6007 धावा आहेत. त्याने आतापर्यंत 5 शतके आणि 31 अर्धशतके केली आहेत. आयपीएलच्या चालू हंगामात राहुलने सात सामन्यांच्या सात डावांत 265 धावा केल्या आहेत. सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत राहुल दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरने त्याच्यापेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याने सहा सामन्यांच्या सहा डावात 375 धावा केल्या आहेत.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 20 षटकात 181 धावा केल्या. त्याच्याकडून कर्णधार फाफ डू प्लेसिसने सर्वाधिक 96 धावा केल्या. 64 चेंडूंच्या खेळीत त्याने 11 चौकार आणि 2 षटकार मारले. शाहबाज अहमदने 22 चेंडूत 26 आणि ग्लेन मॅक्सवेलने 11 चेंडूत 23 धावा केल्या. 181 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौचा संघ 20 षटकांत आठ गडी गमावून 163 धावाच करू शकला. त्याच्यासाठी कृणाल पांड्याने 28 चेंडूत 42, कर्णधार केएल राहुलने 24 चेंडूत 30 आणि मार्कस स्टॉइनिसने 15 चेंडूत 24 धावा केल्या. आरसीबी संघाने हा सामना 18 धावांनी जिंकला.

Advertisement

सर्वात जलद 6000 धावा करणारे भारतीय फलंदाजांचा
केएल राहुल 165 डाव
विराट कोहली 184 डाव
शिखर धवन 214 डाव
सुरेश रैना 217 डाव
रोहित शर्मा 228 डाव

Advertisement
Advertisement

Leave a Reply