Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IND vs SA: शमी ने दिला दक्षिण आफ्रिकेला पहिला झटका

मुंबई –    भारत आणि दक्षिण आफ्रिका (India VS South Africa)यांच्यात केपटाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर तिसरा आणि अंतिम सामना खेळला जात आहे. अखेरच्या कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर २१२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.(IND vs SA: Shami gives first blow to South Africa)

Advertisement

दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात 23 धावांवर पहिला धक्का बसला आहे. एडन मार्करम (Aidan Markram) 16 धावा करून बाद झाला. तो मोहम्मद शमीच्या (Shami) गोलंदाजीवर  केएल राहुलच्या हाती झेलबाद झाला. सध्या कर्णधार डीन एल्गर तीन धावांवर तर कीगन पीटरसन शून्यावर आहे. दक्षिण आफ्रिकेला अजूनही 189 धावांची गरज आहे. मार्करमने या मालिकेत सहा डावात 12.66 च्या सरासरीने 76 धावा केल्या. शमीने या मालिकेत चार वेळा मार्करमला बाद केले आहे.
भारतीय संघ दुसऱ्या डावात 198 धावांत सर्वबाद झाला. ऋषभ पंतने संघासाठी सर्वाधिक 100 धावा केल्या आणि तो नाबाद राहिला. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे चौथे शतक ठरले. भारताने पहिल्या डावात 223 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा डाव 210 धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात भारतीय संघ १३ धावांची आघाडी घेऊन मैदानात उतरला. या अर्थाने दुसऱ्या डावात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर २१२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

Loading...
Advertisement

58 धावांत चार विकेट पडल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी डाव सांभाळला आणि भारताला 150 च्या पुढे नेले. दोघांमध्ये पाचव्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी झाली. कोहली 143 चेंडूत 29 धावा करून बाद झाला. यानंतर अश्विन आणि शार्दुल ठाकूर काही विशेष करू शकले नाहीत. अश्विन सात आणि शार्दुल पाच धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले.(IND vs SA: Shami gives first blow to South Africa)

Advertisement
Advertisement

Leave a Reply