Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IPL 2022: मेगा लिलाव होणार आणखी चुरशीचा; “हा” दिग्गज फलंदाज असणार स्पर्धेत

मुंबई : जगातील महान फलंदाज पैकी एक असणारा इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट (England’s Test captain Joe Root) पुन्हा एकदा आयपीएलचा (IPL 2022) विचार करत आहे. तो लवकरच मेगा लिलावामध्ये (Mega auction) आपला नाव देण्याची दाट शक्यता आहे. 2018 मध्ये त्याने आयपीएल मध्ये आपले नाव दिले होते. मात्र, त्याच्यावर कोणत्याही संघाने बोली लावली नव्हती. मात्र यावेळी अनेक संघाला कर्णधाराची आवश्यकता असल्याने यावेळी त्याच्या नावावर  बोली लागू शकते.  एका मुलाखतीमध्ये त्याने सांगितले की, या लीगमध्ये खेळायला आवडेल मात्र माझ्याकडे वेळ कमी आहे पण मला विचार करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. (IPL 2022: Mega auction to be even more fun)

Loading...
Advertisement

कसोटी क्रिकेटवर नकारात्मक परिणाम होईल का, यावर मुलाखतीमध्ये जो रूटने सांगितले की, जर मला तसे वाटत नसेल तरच मी स्वतःला लिलावासाठी उभे करेन, परंतु मी असे काहीही करणार नाही ज्यामुळे इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेट खेळताना त्रास होईल. हे माझे आणि इतर खेळाडूंचे प्राधान्य आहे याची खात्री करणे खूप महत्वाचे आहे. आगामी हंगामापूर्वी, 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरूमध्ये आयपीएलचा मोठा लिलाव होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनेही (Mitchell Stark) बुधवारी सांगितले की, आगामी व्यस्त वेळापत्रक असूनही तो आयपीएलमध्ये परतण्याचा विचार करत आहे.ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनेही आयपीएल लिलावात आपल्या नावाचा समावेश करण्याबाबत वक्तव्य केले आहे.  आयपीएलचा  लिलाव फेब्रुवारीमध्ये होणार आहे.(IPL 2022: Mega auction to be even more fun)

Advertisement
Advertisement

Leave a Reply