Take a fresh look at your lifestyle.

IND vs SA : धोनीवर पंत ठरला भारी..! पहा नेमकी काय मारली आफ्रिकेत त्याने भरारी..!

मुंबई – भारतीय संघ दुसऱ्या डावात 198 धावांत सर्वबाद झाला. ऋषभ पंतने (Rishabh Pant) संघासाठी सर्वाधिक 100 धावा केल्या आणि तो नाबाद राहिला. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे चौथे शतक ठरले. भारताने पहिल्या डावात 223 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा डाव 210 धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात भारतीय संघ १३ धावांची आघाडी घेऊन मैदानात उतरला. त्यामुळे आता  दुसऱ्या डावात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर २१२ धावांचे लक्ष्य ठेवले असून सामन्यात आणखी दोन दिवस शिल्लक आहे. (IND vs SA: Pant became the first wicketkeeper in Asia to achieve this feat in Africa)

Advertisement

भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने 10 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन कसोटीत त्याने कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले. शेवटचे शतक पंतने मार्च २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध केले होते. याशिवाय त्याने 2019 मध्ये सिडनीच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावले होते.  तर पंतने 2018 मध्ये केनिंग्टन ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध पहिले शतक झळकावले होते. तसेच पंत दक्षिण आफ्रिकेत शतक झळकावणारा पहिला आशियाई यष्टिरक्षक ठरला. महेंद्रसिंग धोनी आणि कुमार संगकारा यांनाही आफ्रिकेच्या मैदानावर शतक झळकावता आले नाही. दक्षिण आफ्रिकेत धोनीची सर्वोच्च धावसंख्या 90 आणि संगकाराची 89 होती.

Advertisement

रहाणे पुन्हा फ्लॉप : केपटाऊन कसोटीचा तिसरा दिवस भारतासाठी खराब गेला आहे. दिवसाच्या पहिल्या दोन षटकांत संघाने दोन महत्त्वपूर्ण विकेट गमावल्या. दिवसाच्या पहिल्याच षटकात चेतेश्वर पुजाराने आपली विकेट गमावली. त्यानंतर पुढच्याच षटकात अजिंक्य रहाणे ही पॅव्हेलियन मध्ये परतला. पुजारा नऊ धावांवर बाद झाला, तर रहाणेला एक धावा करता आली. हे दोन्ही खेळाडू गेल्या काही काळापासून फॉर्ममध्ये दिसत नाहीत. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात दोघांनी चांगला खेळ केला होता, मात्र या सामन्यात त्यांना फार काही करता आले नाही. पुजाराला जेन्सनने पॅव्हेलियनमध्ये तर रहाणेला रबाडाने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. (IND vs SA: Pant became the first wicketkeeper in Asia to achieve this feat in Africa)

Advertisement
Advertisement

Leave a Reply