IND vs SA: पुजारा-रहाणे पुन्हा फ्लॉप, सोशल मीडियावर चाहते नाराज, म्हणाले ….
मुंबई – भारत आणि दक्षिण आफ्रिका (India VS South Africa) यांच्यातील तिसरा आणि शेवटचा कसोटी सामना न्यूलँड्स, केपटाऊन येथे सुरू आहे. भारतीय संघाने दुसऱ्या डावात 100 हून अधिक धावांची आघाडी घेतली. मात्र तिसऱ्या दिवशी टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली आहे.(IND vs SA: Pujara-Rahane flops again, fans angry on social media, said ….)
संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हे दोघेही एका धावेतच पॅव्हेलियनमध्ये परतले. पुजारा 33 चेंडूत 9 धावा करून बाद झाला आणि रहाणेने 9 चेंडूत एक धाव घेतली. आपल्या फॉर्ममुळे सतत टीकेला सामोरे जाणाऱ्या या दोन्ही फलंदाजांनी पुन्हा निराश होऊन संघाला अडचणीत टाकले.
दोन्ही खेळाडूंच्या सध्याच्या फॉर्मचा आकडेवारीत विचार केला तर, १ जानेवारी २०२० पासून पुजाराने फक्त आठ अर्धशतके झळकावली आहेत, तर रहाणे केवळ चार वेळाच धावा करू शकला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतही दोन्ही खेळाडू अपयशी ठरले आहेत. वाँडरर्स कसोटीच्या दुसऱ्या डावातील अर्धशतक वगळता दोन्ही खेळाडूंनी निराशा केला आहे. या मालिकेत पुजाराने 20.66 च्या सरासरीने 124 तर रहाणेने 22.66 च्या सरासरीने 136 धावा केल्या आहेत.
ट्विटरवर चाहते संतापले
पुजारा आणि रहाणे पुन्हा अपयशी ठरल्यानंतर, सोशल मीडियावर लोकांनी दोन्ही खेळाडूंवर जोरदार टीका केली आणि त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना फटकारले. चाहत्यांनी भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांचीही खरडपट्टी काढली(IND vs SA: Pujara-Rahane flops again, fans angry on social media, said ….)
@BCCI @JayShah @SGanguly99 DON'T NEED EVEN 1 RUNS CONTRIBUTION FROM THEM 🙏🙏 JOD KE NIKAL DO https://t.co/aSyyLTjFWu
Advertisement— BitterSpy (@RitzOfficial5) January 13, 2022
Advertisement