Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भारताला मोठा झटका! आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेतून हा खेळाडू बाहेर

 मुंबई – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) वनडे मालिकेपूर्वी (ODI series) भारतीय संघाला (Indian team) मोठा झटका बसला आहे. फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर (Spinner Washington Sunder) वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदर हा कोरोना पॉझिटिव्ह (Corona positive) आढळला आहे, त्यामुळे तो आता दक्षिण आफ्रिकेत जाणार नाही.(Big blow to India! The player is out of the ODI series against Africa)
बेंगळुरू येथील शिबिरात सुंदरची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आढळून आली. त्यामुळे तो आता एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. त्यांच्या जागी जयंत यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे. एकदिवसीय मालिका खेळणारे खेळाडू आज दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले आहेत. मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 19 जानेवारीला होणार आहे.

Advertisement

याशिवाय सिराजचा बॅकअप म्हणून नवदीप सैनीचाही (Navdeep Saini) संघात समावेश करण्यात आला आहे. कसोटी मालिकेदरम्यान सिराजला दुखापत झाली. यामुळेच मोहम्मद सिराज कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना खेळत नाहीये. अशा परिस्थितीत, सिराजच्या दुखापतीच्या पार्श्वभूमीवर, बीसीसीआयने बॅकअप म्हणून नवदीप सैनीचा वनडे संघात समावेश केला आहे.

Loading...
Advertisement

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. पहिला एकदिवसीय सामना 19 जानेवारीला, दुसरा एकदिवसीय सामना 21 जानेवारीला आणि तिसरा एकदिवसीय सामना 23 जानेवारीला खेळवला जाईल.(Big blow to India! The player is out of the ODI series against Africa)

Advertisement
Advertisement

Leave a Reply