Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

दोन वर्षानंतर फलंदाजी न करता विराट कोहलीने पूर्ण केला आपला शतक

मुंबई –  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी (The third test) सामन्याच्या पहिल्या दिवशी कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) अवघ्या काही धावांनी शतक हुकले मात्र दुसऱ्या दिवशी त्याच्या नावावर आणखी एक शतक जमा झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या पाहिल्या डावात त्याने 2 झेल घेतले आहे. याच बरोबर त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 100 झेल घेण्याची अप्रतिम कामगिरी केली.(After two years, Virat Kohli completed his century without batting)

Advertisement

कोहलीने रहाणेला मागे टाकले आहे. रहाणेने त्याच्या कसोटी कारकिर्दीत क्षेत्ररक्षक म्हणून 99 झेल घेतले आहेत.  क्षेत्ररक्षक म्हणून 100 झेल घेणारा कोहली हा भारताचा सहावा खेळाडू ठरला आहे. राहुल द्रविडने क्षेत्ररक्षक म्हणून कसोटीत सर्वाधिक झेल घेतले आहेत. द्रविडने त्याच्या कसोटी कारकिर्दीत एकूण 210 झेल घेतले. यानंतर व्हीव्हीएस लक्ष्मणने 135 झेल घेतले.

Loading...
Advertisement

भारताच्या सचिन तेंडुलकरने क्षेत्ररक्षक म्हणून आपल्या कसोटी कारकिर्दीत 115 झेल घेण्याची अप्रतिम कामगिरी केली. सुनील गावस्कर यांनी आपल्या कारकिर्दीत 108 झेल घेतले आहेत. त्याचबरोबर मोहम्मद अझरुद्दीनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत एकूण 105 झेल घेतले. कोहलीने दोन वर्षांपासून बॅटने शतक केले नसले तरी झेल घेण्याच्या बाबतीत कोहलीने शतक पूर्ण करून कसोटी क्रिकेटमध्ये नक्कीच एक अनोखा पराक्रम केला आहे.(After two years, Virat Kohli completed his century without batting)

Advertisement
Advertisement

Leave a Reply