Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘या’ दिवशी अहमदाबाद आणि लखनऊ करणार आपल्या तीन खेळाडूंच्या नावाची घोषणा

मुंबई – अहमदाबाद (Ahmedabad )आणि लखनऊ (Lucknow) या दोन नवीन आयपीएल (IPL) संघांना लिलावापूर्वी प्रत्येकी तीन खेळाडूंची निवड करण्याची संधी देण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार आता यासाठी BCCI ने अंतिम तारीख निश्चित केली आहे.

Advertisement

समोर आलेल्या माहितीनुसार बीसीसीआय दोन्ही संघांना 22 जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. बुधवारी 12 जानेवारी सकाळी त्यांना मेलद्वारे याबाबत माहिती देण्यात आली. लिलावापूर्वी ड्राफ्टद्वारे तीन खेळाडूंची निवड करण्याचे अधिकार नवीन संघांना देण्यात आले आहेत. यामध्ये ते त्यांच्या संघात केवळ एका विदेशी खेळाडूचा समावेश करू शकतात. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही संघांना लिहिलेल्या पत्रात 22 जानेवारीला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत वेळ असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

दोन्ही संघांना सुरुवातीला दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला होता मात्र CVC कॅपिटलला जास्त वेळ लागल्याने आता वेळ कमी करण्यात आले आहे. आयपीएलचा मोठा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारीला बेंगळुरूमध्ये होणार आहे. बीसीसीआयने यापूर्वीच हेच नियोजन केले होते. गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत लिलावाच्या तारखा आणि ठिकाणाबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला.

Loading...
Advertisement

खेळाडू निवडण्याचे नियम काय आहेत?
नियमांनुसार नवीन संघ तीन खेळाडूंसाठी 33 कोटी रुपये खर्च करू शकतात. जर त्यांनी कॅप्ड खेळाडूंची निवड केली तर तीन खेळाडूंसाठी 15 कोटी, 11 कोटी आणि 7 कोटी रुपयांचा स्लॅब तयार करण्यात आला आहे. या अनकॅप्ड खेळाडूंपैकी एकाला करारबद्ध केले तर त्याला ४ कोटी रुपये खर्च करावे लागतील. यापूर्वी आठ संघांना प्रत्येकी चार खेळाडू कायम ठेवण्याचा अधिकार मिळाला होता.

Advertisement

लखनऊ फ्रँचायझी केएल राहुलला कर्णधार बनवू शकते. संघ कागिसो रबाडा आणि मार्कस स्टोइनिस यांना करारबद्ध करू शकतो. फ्रँचायझीने संघाचा मार्गदर्शक म्हणून गौतम गंभीर, मुख्य प्रशिक्षक म्हणून झिम्बाब्वेचे अँडी फ्लॉवर आणि सहाय्यक प्रशिक्षक म्हणून विजय दहिया यांची नियुक्ती केली आहे.

Advertisement

तर दुसरीकडे अहमदाबाद हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्याचा विचार करत आहे. याशिवाय मुंबई इंडियन्सचा माजी यष्टीरक्षक फलंदाज इशान किशन आणि सनरायझर्स हैदराबाद माजी लेगस्पिनर राशिद खान यांचा संघात समावेश करू शकतो. सपोर्ट स्टाफबद्दल बोलायचे तर, भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा मुख्य प्रशिक्षक आणि टीम इंडियासाठी 2011 मध्ये विश्वचषक जिंकणारा दक्षिण आफ्रिकेचा गॅरी कर्स्टन मार्गदर्शक बनू शकतो. इंग्लंडचे विक्रम सोलंकी संघाचे संचालक आणि फलंदाजी सल्लागार असू शकतात.

Advertisement
Advertisement

Leave a Reply