Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

ICC Test rankings: कोहली ने आपले स्थान राखले कायम तर स्मिथने या खेळाडूला टाकले मागे

मुंबई – ऍशेस मालिकेतील (Ashes series) चौथा कसोटी सामना आणि न्यूझीलंड-बांगलादेश मालिका संपल्यानंतर आयसीसी टेस्ट क्रमवारीत (ICC Test Rankings) अनेक बदल पाहिला मिळत आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथने (Steve Smith) न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला (Ken Williamson) मागे टाकत तिसरे स्थान मिळवले आहे. तर सध्या खराब फॉर्ममध्ये असलेला भारतीय कसोटी क्रिकेटचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) टॉप 10 मध्ये आपला स्थान कायम राखले आहे.(ICC Test rankings announced: Kohli retains position, Smith knocks out player)

Advertisement

स्टीव्ह स्मिथ तिसऱ्या स्थानावर आहे तर त्याचा सहकारी मार्नॅश लॅबुशेन अव्वल स्थानावर असुन या दोघांमध्ये इंग्लंडचा कर्णधार जो रूट आहे. या क्रमवारीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. लॅबुशेनने सिडनी कसोटीत 28 आणि 29 धावा केल्या. त्याचवेळी रूटला पहिल्या डावात खातेही उघडता आले नव्हते आणि दुसऱ्या डावात 24 धावा करून तो बाद झाला होता. भारताविरुद्ध जोहान्सबर्ग कसोटीत शानदार फलंदाजी करणाऱ्या डीन एल्गरला चार स्थानाचा फायदा झाला आहे. एल्गार चार स्थानांनी चढून दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. एल्गरने दुसऱ्या डावात नाबाद 96 धावांची खेळी करत आफ्रिकन संघाला विजय मिळवून दिला होता.

Loading...
Advertisement

सिडनी कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा उस्मान ख्वाजा पुन्हा एकदा टॉप-100 मध्ये आला आहे. तो 26 व्या स्थानावरून परतला आहे. बांगलादेशचा लिटन दास 17 स्थानांनी वर चढून 15व्या स्थानावर आहे. न्यूझीलंडच्या डेव्हन कॉनवेने 18 स्थानांची झेप घेत 29व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.(ICC Test rankings announced: Kohli retains position, Smith knocks out player)

Advertisement
Advertisement

Leave a Reply