SA vs IND: किंग कोहलीने मोडला हेड कोच द्रविडचा विक्रम , हा पराक्रम करणारा ठरला दुसरा भारतीय फलंदाज
मुंबई – भारतीय कसोटी संघचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मागच्या काही दिवसांपासून फॉममध्ये नाही. मात्र तरी देखील त्याने भारतीय संघाचा हेड कोच राहुल द्रविडचा (Head Coach Rahul Dravid) विक्रम मोडीत काढून त्याला मागे टाकला आहे.दक्षिण आफ्रिकेमध्ये (South Africa) कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा कोहली दुसरा फलंदाज ठरला आहे. द्रविडने दक्षिण आफ्रिकेत कसोटी खेळताना एकूण 624 धावा केल्या.(SA vs IND: King Kohli breaks head coach Dravid’s record, becomes second Indian batsman)
तर कोहलीच्या दक्षिण आफ्रिकेतील कसोटीत एकूण 625 धावा झाल्या आहेत. भारताकडून दक्षिण आफ्रिकेत कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) नावावर आहे. तेंडुलकरने कसोटीत 1 हजार 161 धावा केल्या आहेत. सचिनने 15 कसोटी सामन्यांमध्ये हा पराक्रम केला.
भारत-दक्षिण आफ्रिका कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 25 कसोटी सामने खेळले ज्यात त्याने 1 हजार 741 धावा केल्या आहेत तर सेहवाग भारतासाठी दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने 15 कसोटी सामन्यांमध्ये 1 हजार 306 धावा केल्या आहेत. द्रविडने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत 1 हजार 252 धावा केल्या आहेत.
सध्या आफ्रिका विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवशी भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 4 बाद 167धावा केल्या आहेत. भारताचे दोन्ही सलामीवीर केएल राहुल आणि मयंक लवकर बाद झाले. कोहलीची ही 99 वी कसोटी आहे. अशा परिस्थितीत विराट आपला 99 वा कसोटी सामना संस्मरणीय बनवेल आणि मोठी खेळी खेळेल, अशी आशा चाहत्यांना आहे.(SA vs IND: King Kohli breaks head coach Dravid’s record, becomes second Indian batsman)