Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘हे नशीब नेमकं कोणाचं..’; राष्ट्रवादीने केलाय नरेंद्र मोदी यांना खोचक प्रश्न

मुंबई : देशात करोना पाठोपाठ महागाईच्या संकटाने नागरिक हैराण झाले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दरात तर इतकी वाढ झाली आहे, की काही शहरांत पेट्रोलने शंभरी पार केली आहे. आजही नागरिकांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढवले आहेत.

Advertisement

या मुद्द्यावर विरोधी पक्ष आक्रमक झाले असून केंद्र सरकारवर जोरदार टीका करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ‘देशाचे प्रधानसेवक नरेंद्र मोदी २०१५ मध्ये माझ्या नशीबाने जर पेट्रोलचे भाव कमी झाले असते तर चांगले झाले असते, असे सांगत होते. मात्र, आता २०२१ मध्ये पेट्रोलने शंभरी गाठली आहे. हे नशीब कुणाचे,’ असा सवाल करत त्यांनी मोदींवर टीका केली आहे. पेट्रोलने शंभरी पार केल्यानंतर २०२१ मध्ये नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत. त्यामुळे शेवटी काय तर कमनशिबी जनता, अशी टीका त्यांनी ट्विटद्वारे केली आहे.

Advertisement

(2) NCP on Twitter: “आपल्या नशीबामुळे देशात पेट्रोलचे भाव कमी झाले आहेत तर जनतेसाठी चांगलंच आहे, असं मा. पंतप्रधान २०१५ मध्ये जाहीर भाषणात सांगत होते. आता २०२१ मध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे, आता कुणाचं नशीब म्हणायचं प्रधानमंत्री महोदय? – @nawabmalikncp @PMOIndia #PetrolDieselPriceHike https://t.co/OSNtNae8Gg” / Twitter

Loading...
Advertisement

तसे पाहिले तर देशात आजमितीस इंधनाच्या किमतीवर काहीच नियंत्रण राहिल्याचे दिसत नाही. पेट्रोलियम कंपन्या कोणताच विचार न करता मनमानी पद्धतीने दरवाढ करत आहे. सरकारही यामध्ये हस्तक्षेप करायला तयार नाही. मागील महिन्यात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत्या. याच काळात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले  नाहीत. करोना संकटात तेवढाच दिलासा जनतेला मिळाला. त्यानंतर मात्र इंधनाच्या दरवाढीची एक्सप्रेस सुस्साट निघाली आहे. आज तर अशी परिस्थिती आहे, की देशातील अनेक शहरांत पेट्रोलने शंभरी पार केली आहेत. महाराष्ट्रात पंधरा जिल्ह्यांत पेट्रोलने शंभरी गाठली आहे. आजही पेट्रोलियम कंपन्यांनी दर वाढवले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता भविष्यात तरी किमती कमी होतील का, याबाबत आज काहीही सांगता येणे कठीणच आहे.

Advertisement

याचा सर्वसामान्य नागरिकांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. इंधनाचे दर कमी करण्याची मागणी विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत मात्र, त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. सरकारने याकडे लक्षच दिलेले नाही. इंधनाचे दर वाढवून सरकारला मोठा महसूल मिळत असला तरी या दरवाढीने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळेच आता पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करण्याची मागणी होत आहे. विरोधक या मुद्द्यावर केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply