Mumbai Rain Alert : मुंबईत अवकाळी पावसाचा कहर, 12 जणांचा मृत्यू

Mumbai Rain Alert : मुंबईसह आजूबाजूच्या काही भागात 13 मे रोजी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. 13 मे च्या दुपारपासून मुंबईसह आजूबाजूच्या काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पाहायला मिळाला. जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली.

मुंबईत मुसळधार पाऊस आणि वादळामुळे मुंबई विमानतळावरील विमानसेवा प्रभावित झाली आहे. यासोबतच मुंबई मेट्रोही ठप्प झाली होती. याशिवाय घाटकोपर परिसरात होर्डिंग पडल्याने 12 जणांचा मृत्यू झाला असून 64 जण जखमी झाल्याची माहिती आहे.

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे लोकांचे प्रचंड हाल झाले. यासोबतच अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटलेल्या दिसतात. मोठमोठे होर्डिंग कोसळले आहेत.

ठाण्याजवळ मध्य रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. याशिवाय मुंबई शहरात ठिकठिकाणी झाडे पडल्याच्या आणि पाणी साचल्याच्या बातम्या आल्या आहेत.

 मुंबईतील घाटकोपर, वांद्रे कुर्ला, धारावी भागात जोरदार वारे आणि पाऊस दिसला. देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक असलेल्या मुंबई विमानतळावरील लँडिंग आणि टेकऑफ ऑपरेशन्स तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Comment