Mumbai Police: Mumbai: मुंबईत आता चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना सीट बेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.पुढील सीट असो की मागच्या सीटवर, प्रत्येकाला सीट बेल्ट लावावा लागणार आहे. सीट बेल्ट (seat belt)न लावल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) हा निर्णय घेतला आहे. मुंबईत हा नियम १ नोव्हेंबरपासून (1 November) लागू होणार आहे. त्यामुळेच पोलिस सर्व प्रवाशांना आवाहन करत आहेत की, जर त्यांना सीटबेल्ट लावण्याची सोय नसेल, तर त्यांनी लवकरात लवकर सीट बेल्ट लावावा.
मुंबईच्या वाहतूक पोलिस आयुक्तांनी (Commissioner of Mumbai Traffic Police) एक प्रेस नोट जारी केली आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की २०१९ च्या मोटार वाहन दुरुस्ती कायद्यानुसार जो कोणी सीट बेल्ट न लावता मोटार चालवतो आणि त्याच्यासोबत बसलेल्या प्रवाशाने सीट बेल्ट लावला नाही तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. १ नोव्हेंबरपासून हा नियम लागू होणार आहे.
सीट बेल्ट न लावल्यास होणार दंड आकारणी
१ नोव्हेंबरपासून मुंबईच्या रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांनी सीट बेल्ट लावणे आवश्यक असेल. मोटार दुरुस्ती कायदा २०१९ च्या कलम १९४(ब) अंतर्गत या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. मुंबई पोलिसांनी सर्व प्रवाशांना सीट बेल्ट काटेकोरपणे बांधण्याचे आवाहन केले आहे. मुंबईत आता चारचाकी वाहनांमध्ये बसणाऱ्या प्रवाशांना सीट बेल्ट लावावा लागणार आहे.
रस्ते सुरक्षेबाबत सरकार कठोर
रस्ते सुरक्षेसाठी सरकार पूर्णपणे कडक झाले आहे. नुकतेच परिवहन मंत्री नितीन गडकरी (Transport Minister Nitin Gadkari) यांनी सांगितले होते की, गाडीच्या मागील सीटवर बसलेल्या प्रवाशांसाठी सीट बेल्ट अलर्टची यंत्रणा लवकरच सुरू केली जाऊ शकते. वास्तविक, टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री (Cyrus Mistry, former chairman of Tata Sons) यांचा पालघरमधील (Palghar) रस्ता अपघातात मृत्यू झाल्यानंतर सरकारने मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांसाठी सीट बेल्ट अलर्टची यंत्रणा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.
- Must Read:
- BJP Mission Mumbai: शिवसेनेच्या हातातील मुंबई घेण्यासाठी ‘अशी’ आखली रणनीती; मंत्री शाहही परवा येणार
- Pune News : सामान्य नागरिकांना मिळणार हक्काचे घर
- Omicron Variant: या व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटचा भारतात प्रसार, कितपत घातक आाहे हा विषाणू?
चारचाकी वाहनात सीट बेल्ट लावणे आवश्यक
नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले होते की, सायरस मिस्त्री यांच्या अपघातानंतर सरकारने कारच्या मागील सीटवर बसलेल्या प्रवाशांसाठी सीट बेल्ट अलर्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नियम न पाळणाऱ्यांना दंड भरावा लागणार आहे. ज्यांनी गाडीच्या मागच्या सीटवर बेल्ट लावला नाही, मग आवाज येईल, त्यानंतर कळेल की मागे बसलेल्या लोकांनी सीट बेल्ट घातलेला नाही. त्यानंतर त्यांना दंड भरावा लागेल. आता कारच्या मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांनी सीट बेल्ट लावणे आवश्यक असेल, असे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे.