मुंबई : मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाच्या आराखडय़ाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिल्यानंतर महापालिकेने आता नियोजन सुरू केले आहे. पालिका निवडणुकीआधी हा प्रकल्प पूर्ण करून मतदारांना आकर्षित करण्याचा राज्यातील सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप होत आहे. निश्चित केलेल्या मुदतीत हा प्रकल्प पूर्ण करताना पालिकेची दमछाक होत असताना आता निधीची जुळवाजुळव करतानाही आकस्मिक निधी वळता करण्याची वेळ आली आहे. या प्रकल्पासाठी १७०५ कोटींचा खर्च येणार आहे. त्यापैकी २५० कोटींचा खर्च आकस्मिक निधीतून करण्यात येणार आहे. हा प्रकार ‘ऋण काढून सण साजरा’ करण्याचा आहे, अशी टीका पालिका प्रशासनावर होत आहे.
सुशोभीकरणाच्या या प्रकल्पांतर्गत पदपथ सुधारणा ६०कोटी, स्कायवॉकवर दिवाबत्ती४०कोटी ,समुद्र किनाऱ्यांवर रोषणाई २५कोटी,उद्यानांचे सुशोभीकरण-दिवाबत्ती१५कोटी, जाहिरातीसाठी डिजीटल फलक १०कोटी,किल्ल्यांची रोषणाई २५कोटी,गेट वे ऑफ इंडियाचे सुशोभीकरण २०कोटी,मियावाकी वृक्षलागवड दोन कोटी, स्वच्छतेसाठी यांत्रिक उपकरणे १५कोटी,सुविधा शौचालयांची निर्मिती ७८कोटी अशा एकूण २९० कोटी आकस्मिक निधीतून वापरला जाणार आहे. हा प्रकल्प १७०५ कोटींचा आहे. त्यापैकी ९०० कोटी रुपयांचा निधी विभाग स्तरावर दिला जाणार आहे, तर रस्ते, पूल, उद्यान कक्ष अशा मध्यवर्ती यंत्रणा स्तरावर ७९० कोटींचा खर्च केला जाणार आहे. रस्त्यांच्या सुधारणेसाठी ५०० कोटींचा निधी दिला जाणार आहे.
must read
- बाब्बो.. झालाच की घोटाळा; सावरकरप्रकरणी गांधींच्या वक्तव्याने पडणार उभी फूट..!
- Ayurveda Health Tips: पचनशक्ती होऊ लागेल कमजोर ,रात्रीच्या जेवणात ठेवा ” या ” 5 पदार्थांपासून अंतर