Mumbai Lok Sabha | भाजपचं धक्कातंत्र! ‘या’ मतदारसंघात उमेदवार बदलला; पहा, कुणाला मिळालं तिकीट?

Mumbai Lok Sabha Election 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी (Mumbai Lok Sabha Election 2024) जोरात सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मुंबईतील काही मतदारसंघांमध्ये महायुतीमध्ये तिढा निर्माण झाला होता. या मतदारसंघात कुणाला उमेदवारी द्यायची हा प्रश्न महायुतीसमोर उभा होता. मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून कुणाला तिकीट द्यायचे याचा निर्णय होत नव्हता. अखेर भाजपने हा निर्णय आता घेतला आहे. या मतदारसंघातून ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या मतदारसंघात काँग्रेसने माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, या मतदारसंघाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता मात्र कट झाला आहे. पूनम महाजन यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता नव्हती अशा चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. या चर्चा खऱ्या असल्याचे आज समोर आले. भाजपने पूनम महाजन यांच्याऐवजी ज्येष्ठ सरकारी वकील उज्वल निकम यांना या मतदारसंघातून तिकीट दिले आहे.

Sangli Lok Sabha | अर्र.. AB फॉर्म मिळाला नाही, माघार घेणार का?, विशाल पाटलांनी नेमकं काय ठरवलं?

Mumbai Lok Sabha

या मतदारसंघात विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्याबाबत मतदारांमध्ये नाराजी वाढली होती. त्यांना होणारा विरोध पाहता या मतदारसंघात उमेदवार बदलण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसकडून उत्तर मध्य मतदारसंघात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आणि माजी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. आता गायकवाड यांच्या विरोधात महायुतीकडून कोणता उमेदवार दिला जाईल याची उत्सुकता होती. त्यामुळे आज महायुतीने उज्वल निकम यांचे नाव जाहीर केले.

महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला 

दुसरीकडे महाविकास आघाडीने जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करून आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष बारामती, शिरूर, सातारा, भिवंडी, माढा, रावेर आणि अहमदनगर दक्षिण या जागा लढणार आहे. तर ठाकरे गट जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, हातकणंगले, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई या जागा लढवणार आहे.

Mumbai Lok Sabha

Shirdi Loksabha Election | पदाचा गैरवापर करणाऱ्या लोखंडेंची उमेदवारी धोक्यात; त्या’ प्रकरणी शेतकरी संघटना करणार आंदोलन

जागावाटपात काँग्रेस पक्षाला 17 जागा मिळाल्या आहेत यामध्ये नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, रावेर, जालना, मुंबई नॉर्थ सेंट्रल, पुणे, लातूर, सोलापूर, रामटेक आणि उत्तर मुंबई या मतदारसंघांचा समावेश आहे.

Leave a Comment