Mumbai City : मुंबईचा दबदबा, बीजिंगला पछाडले; पहा, मुंबईत किती आहेत अब्जाधीश?

Mumbai City : भारताच्या मुंबई महानगरात (Mumbai City) आता चीनच्या बीजिंगपेक्षा अधिक (Beijing) अब्जाधीश आहेत. बीजिंगला मागे टाकून मुंबईने प्रथमच आशियातील अब्जाधीशांची राजधानी बनण्याचा मान पटकावला आहे. हुरुन रिसर्चच्या 2024 च्या ग्लोबल रिच लिस्टनुसार मुंबई आता बीजिंगपेक्षा अधिक अब्जधीशांचं घर बनलं आहे. या यादीत मुंबईत 92 अब्जाधीश आहेत तर बीजिंगमध्ये 91 अब्जाधीश आहेत. चीनमध्ये एकूण 814 अब्जाधीश आहेत तर भारतात 271 अब्जाधीशांची संख्या आहे. भारतात हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे हे विशेष. (Mumbai Overtakes Beijing to become the Capital of Billionaires )

अब्जाधीशांच्याबाबतीत मुंबई आता जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क सात वर्षानंतर 119 अब्जाधीशंसह पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर ब्रिटनची राजधानीच्या शहराने 97 अब्जधीशांसह दुसरा क्रमांक पटकावला आहे. एका वर्षात 26 नवीन अब्जाधीशांची भर घालून न्यूयॉर्कने चीनची राजधानी बीजिंग शहराला मागे टाकले आहे. याच काळात 18 अब्जाधीश चीनच्या राजकीय आणि सांस्कृतिक राजधानी सोडून दुसऱ्या शहरात स्थलांतरित झाले आहेत.

Mumbai City

GeM-Tender Training in Marathi | सरकारी ठेकेदार होण्यासाठी सुवर्णसंधी; पहा कुठे मिळते सोप्या भाषेत प्रशिक्षण

हुरून रिसर्च च्या 2024 ग्लोबल रिच लिस्टनुसार मुंबईच्या अब्जाधीशांची एकूण संपत्ती सुमारे 37 हजार 90 अब्ज रुपये इतकी आहे. जी मागील वर्षाच्या तुलनेत 47% जास्त आहे तर बीजिंगच्या अब्जाधीशांच्या एकूण संपत्तीत मात्र घट झाली आहे. बीजिंगमधील अब्जाधीशांची एकूण संपत्ती सुमारे 22 हजार 87 अब्ज रुपये इतकी आहे. मुंबईच्या संपत्ती क्षेत्रांमध्ये ऊर्जा आणि फार्मस्युटीकल्स क्षेत्रांचा समावेश आहे. यामध्ये मुकेश अंबानींसारख्या अब्जाधीशांना लक्षणीय फायदा झाला आहे.

दिल्ली टॉप 10 शहरांच्या यादीत 

हुरुन ग्लोबल रिच लिस्टनुसार मुंबई ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अब्जाधीशांची राजधानी ठरली आहे. मुंबईत यंदा 26 अब्जाधीशांची भर पडली आहे. या यादीत नवी दिल्ली (New Delhi) प्रथमच टॉप 10 शहरांच्या यादीत सहभागी आहे. हुरुन लिस्ट 2024 नुसार पामबीच, इस्तंबूल, मेक्सिको सिटी आणि मेलबर्न या शहरांचा समावेश टॉप 30 शहरांच्या यादीत झाला आहे. मुंबईच्या संपत्तीमध्ये 47 टक्क्यांनी वाढ झाली आहे तर बीजिंगमधील अब्जाधीशांच्या संपत्तीत मात्र 28 टक्के घट झाली आहे.

Mumbai City

China PLA War : चीनची खुमखुमी वाढली! चीनी आर्मीची घोषणा; ‘या’ कारणासाठी होणार अब्जावधींचा खर्च

Leave a Comment