Multibagger stocks : गुंतवणूकदारांनो! पहिल्याच दिवशी 200 रुपयांवर पोहोचेल ‘हा’ शेअर, किंमत आहे फक्त…

Multibagger stocks : शेअर मार्केटमध्ये अनेक कंपन्या आपले IPO घेउन येत असतात. अशाच एका कंपनीने आपला IPO आणला आहे. हा शेअर पहिल्याच दिवशी 200 रुपयांपर्यंत पोहोचेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. हे लक्षात घ्या की या IPO मधील शेअरची किंमत 75 रुपये आहे.

पहिल्याच दिवशी 200 रुपयांच्या जवळ जाईल हा शेअर

किमतीचा विचार केला तर IPO मध्ये Winsol Engineers च्या शेअरची किंमत 75 रुपये इतकी आहे. त्याच वेळी, कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 124 रुपयांच्या प्रीमियमवर व्यवहार करत असून यानुसार विन्सॉल इंजिनिअर्सचे शेअर्स 199 रुपयांच्या आसपास बाजारात लिस्ट होतील.

ज्या गुंतवणूकदारांना IPO मध्ये कंपनीचे शेअर्स मिळतील त्यांना लिस्टिंगच्या दिवशी 165 टक्क्यांपेक्षा जास्त नफा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर कंपनीच्या IPO मधील समभागांचे वाटप 10 मे 2024 रोजी अंतिम असणार आहे. Winsol Engineers चे शेअर्स 14 मे 2024 रोजी बाजारात सूचीबद्ध केले जाणार आहेत.

हे लक्षात घ्या की विनसोल इंजिनिअर्सचा आयपीओ सोमवारपासून म्हणजेच आजपासून हा शेअर सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. किरकोळ गुंतवणूकदार कंपनीच्या IPO मध्ये 1 लॉटसाठी बोली लावू शकतात. या IPO च्या एका लॉटमध्ये 1600 शेअर्स आहेत.

म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना कंपनीच्या IPO मध्ये 120,000 रुपये गुंतवावे लागणार आहेत. तर त्याच वेळी, उच्च नेट वर्थ व्यक्ती कंपनीच्या IPO मध्ये 2 लॉटसाठी बोली लावू शकतात. या कंपनीचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या SME प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जाणार आहेत. तर IPO पूर्वी, कंपनीमध्ये प्रवर्तकांची हिस्सेदारी 100% होती, जी आता 72.99% होईल. Winsol Engineers डिसेंबर 2015 मध्ये सुरू झाले. कंपनी सौर आणि पवन ऊर्जा निर्मितीच्या व्यवसायात गुंतलेली आहे.

Leave a Comment